Posts

Showing posts from August, 2023

'मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटतेय', नेत्यांने उपस्थित केली शंका

Image
  राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. त्याचबरोबर मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली आणि दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्यात सुरू असणाऱ्या गाठीभेटींमुळे त्याच्या भूमिकेबाबत अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. दरम्यान संपुर्ण प्रकरणावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी अशीच शंका व्यक्त केली आहे. मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटत आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. नातेसंबंध असले तरी याबाबत स्पष्टता हवी, ती भूमिका यातून सध्या तरी स्पष्ट दिसत नाही त्यांनी कठोर भूमिका घ्यावी असंही  राजू शेट्टी  म्हणाले आहेत. तर 'अ ला विरोध करायचा म्हणून ब सोबत जाणं योग्य आहे. या मताचा मी नाही. आमचा महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे', असंही राजू शेट्टी पुढे म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नित...

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

Image
  राज्याच्या राडकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आधी शिवसेनेत बंड झालं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप यांनी सरकार स्थापण केलं. या सरकारला १ वर्ष होताच राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी झाली. त्यानंतर अनेकांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागलं. त्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदारांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. अशातच मंत्रिपदाच्या रांगेत असलेले आमदार भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारा बाबतचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. आपल्याला मंत्रिपदाने कशी हुलकावणी दिली, याबाबत माहिती त्यांनी अलिबागमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. भरत गोगावले बोलताना म्हणाले की, 'मंत्रिपदासाठी माझाच नंबर पहिला होता, पण जेव्हा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च अडचणीत आले, तेव्हा मात्र मी माघार घेतली', हे सांगत असतानात त्यांनी राजकीय पडद्यामागे नेमके काय घडत होतं, याबाबतचं वर्णन त्यांनी केलं आहे. पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, 'पहिल्या नऊ जणांच्या यादीत मंत्रीपद मला मिळणार होतं, मात्र आमच्यातल्या एका सहकारी आमदाराने सांगितलं मला मंत्रीपद दिलं नाही तर माझी...

कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी.!लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना उतरवणार रिंगणात..?

Image
  ‘गेल्या पाच वर्षांत मतदारसंघ ज्यांना दिसला नाही, त्या संजय मंडलिकांना  संसदरत्न पुरस्कार मिळालाच कसा?, ’ असा सवाल करत खासदार मंडलिक यांचे नाणे आता गुळगुळीत झाले आहे, अशी टीका काँग्रेसकार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्याच कार्यकर्ता किंवा नेत्यालाच लोकसभेची उमेदवारी द्यावी. उसना किंवा आयात केलेल्या उमदेवाराचा विचार करू नये. काँग्रेसशी निष्ठावंत असणारे आमदार पी. एन. पाटील आणि आमदार  सतेज पाटील  यांच्यापैकी एका नेत्याला कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आढावा बैठक घेतली. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपली स्पष्ट आणि सडेतोड मते मांडली. माजी नगरसेविका भारती पवार म्हणाल्या, ‘जिल्ह्यात भाजपची टक्केवारी नगण्य आहे, तरीही भाजपची टक्केवारी वाढवण्यासाठी संभाजी भिडेंसारखा माणूस ग्रामीण भागातून फिरवण्याचे काम भाजप करत आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात न दिसलेल्या खासदार संजय मंडलि...

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

Image
  काल पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची एक गुप्त बैठक उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाली. आज जयंत पाटलांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी शरद पवारांनी मात्र ही भेट गुप्त नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांनाच चिमटा काढला. शनिवारी पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आज शरद पवार सांगोल्यात होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. कुटुंबातील व्यक्तीने वडीलमाणसाला भेटण्यात गैर काय? ते पुढे म्हणाले की, आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय हे खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ तारखेला मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये होणार आहे. ३० ते ४० वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत. मी, उद्धव ठाक रे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजित पवारांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी त्यांना पुन्हा विचारलं. अजित पवार तुमचे प...

मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस..

Image
 राज्यातील राजकारणात कधी काय होईल हे सांगणे अनेकांना कठीण जातंय. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक झाली. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. जवळपास ४ तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जाते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. काका-पुतण्याच्या या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र आता या भेटीनंतर जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. भगतसिंग पाटील हे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. भगतसिंग पाटील यांच्यासोबत जयंत पाटलांच्या आणखी काही निकटवर्तीयांना नोटीस पाठवली आहे. ईडीच्या नोटीस मिळाल्यानंतर अनेकांनी सत्तेसोबत जुळवून घेतले आहे. याआधी हसन मुश्रीफांनाही ईडीची नोटीस आली होती. त्याचसह जयंत पाटील यांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. त्यात मुश्रीफांनी अजित पवारांसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांचीही ईडी चौकशी झाली आहे. अलीकडेच अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा जयंत पाटील आणि शाह यांच्या बैठक झाल्याची बातमी...

धक्कादायक ! छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू..

Image
  ठाणे महानगरपालीकेच्या कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा प्रकारामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हड प्रचंड संतापले होते. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. रुग्णालयातील प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा क...

आंबोली घाटातील 'या' धबधब्याला ग्रामस्थांचा विरोध, सरपंचांनी फाडला 'बॅनर'..नावावरून वाद चिघळणार?

Image
  राज्याच्या पर्यटन विभागाने आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळच्या एका धबधब्याला ''बाहुबली'' हे नाव दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. आंबोली ग्रामस्थांनी या फिल्मी नावाला विरोध केला, तर पारपोली ग्रामस्थांनी आज या धबधब्याच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन मंत्र्यांची वाट न पाहता केले. आंबोली घाटातील धबधब्याला दिलेल्या ‘बाहुबली’ या नावाबाबत येथील ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धबधब्यांना चित्रपटातील नावे देऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, याबाबत शालेयमंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंबोली घाटात अनेक धबधबे आहेत. जवळपास सहा मोठ्या धबधब्यांसह असंख्य लहान धबधबे आहेत. सध्या ‘बाहुबली’ म्हणून गाजणाऱ्या धबधब्यापेक्षा मोठा धबधबा ज्या ठिकाणी दरड पडली, त्याच्या बाजूला आहे. तेथे जागाही विस्तीर्ण असून तो थेट कोसळणारा धबधबा आहे; मात्र याबाबत पर्यटक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. बाहुबली धबधबा रस्त्यानजीक असून, त्याचे अचानक उदघाटन करण्यामागे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आंबोली घाटातील धबधब्यांना नावे देण्याची ...

उत्कृष्ट तपासात महाराष्ट्राला मिळाला भोपळा; वरिष्ठांच्या वारंवार बदल्यांचा फटका? केंद्राने जाहीर केली यादी..

Image
  कधीकाळी स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना उत्कृष्ट तपासासाठी एकही पदक मिळालेले नाही. गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळत असताना महाराष्ट्र पोलिसांचे अपयश धक्कादायक असल्याची चर्चा ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत आहे गृ हमंत्रालयाने 2023 मध्ये उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली. त्यामध्ये यंदा राज्य पोलिंसासह मुंबई पोलिसांना एकही पदक मिळाले नाही. देशभरातील 140 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली.  महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले. मात्र महाराष्ट्राला यंदा पदकं मिळाले नाहीत. यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पोलिसांना 11 पदकं मिळाली होती. मात्र यंदा एकही पदकं मिळाली नाही. यंदा 140  पदकं विविध विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. मात्र महाराष्ट्रातील एकाही अध...

अजित पवार-शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक; काका-पुतण्यामध्ये चर्चा..

Image
  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात काका शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघांमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काही माध्यमांनी अजित पवारांचा बंगल्यामधील व्हिडीओदेखील चालवला. पुण्यातल्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा सर्किट हाऊसकडे रवाना झाला. मात्र त्यानंतर ताफा तिथेच ठेवून अजित पवार एका गाडीत बसून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले. मीडिया रिपोर्टनुसार तिथे शरद पवार उपस्थित होते. काका-पुतण्यामध्ये चर्चा झाली आणि नंतर अजित पवार बाहेर पडले. विशेष म्हणजे काहींच्या मते जयंत पाटील हेदेखील बैठकीसाठी उपस्थित होते. अधिकृत माहिती मात्र मिळू शकलेली नाही. अजित पवार यांची गाडी बंगल्याबाहेर पडत होती, त्यावेळी चालकाच्या चुकीमुळे गाडी गेटला धडकली. तरीही गाडी थांबली नाही तशीच निघून गेली. मागच्या सीटवर कुणीतरी झोपलेलं होतं. तेच अजित पवार असल्याचा दावा माध्यमं करीत आहेत. अजित पवार गटाचे आमदा...

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Image
  राज्यातील गरीब जनतेला ज्यांना केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेणं परवडतं. त्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इथं येणाऱ्या रुग्णाला प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. १५ ऑगस्टपासून लाभ आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध होणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टपासून याचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. आरोग्य मंत्र्यांचा पाठपुरावा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळावेत यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

'हे देवा, देशाला वाचव'; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

Image
    मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीतून सरन्यायाधीश यांना वगळल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. देश अव्यवस्थेकडे जात आहे असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र आणत असलेल्या नव्या विधेयकाचा विरोध केला. निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमध्ये सरन्यायाधीशांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या आहे.   ममता बॅनर्जी  यांनी ट्विटकरुन यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. देश अव्यवस्थेकडे जात आहे. तीन सदस्यीय समितीमध्ये सरन्यायाधीशांची भूमिका निर्णायक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्र्याचा समितीमध्ये समावेश करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक सादर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात या विधेयकावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड करण्याच्या समितीत तीन सदस्य असावेत. ज्यात पंतप्रधान, विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान नियुक्त केंद्रीय मंत्री असेल असे विधेयक राज्यसभेत सादर कर...

"...आम्ही काय बेअक्कल आहेत का?"; पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार संतापले!

Image
  पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचं आज (१२ ऑगस्ट) लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच कोल्डवॉर सुरू असल्याचा दावा कारणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना काही उद्योग उरला नाही अशा शब्दात अजित पवारांनी टीका केली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा होती. मुख्यमंत्री देखील एकदा चांदणी चौकातील वाहतुक कोंडीत अडकले होते. या चांदणी चौकाने कोणालाच सोडलं नाही. सगळ्यांना कमी अधी प्रमाणात या वाहतुक कोंडीने केला असल्याचे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री तब्येतीच्या कारणाने येऊ शकले नाहीत याची नोंद घ्यावी. कारण आलीकडे रुसून गेले, फुगून गेले असं सांगितलं जातं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांचं काम चांगलं सुरू आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस एका बाजूला होतेच. दुसरी बाजू मोकळी होती तिथं मी जाऊन उभा राहिलो.आता दोघंही त्यांच्या बरोबर आहेत...

अखेर आरोपीने दिली भाजपाच्या नेत्या सना खानच्या खुनाची कबुली..सहा महिन्यांपूर्वीच झाले होते सनाशी लग्न

Image
  ज बलपुरला गेल्यावर बेपत्ता झालेल्या भाजपाच्या नेत्या सना खान यांचा अमित उर्फ पप्पू साहू यानेच खून केल्याची माहिती समोर आली आहे. मानकापूर पोलिसांनी त्याला शुक्रवारी सकाळी ११ वाजता जबलपूर येथील गोलबाजार परिसरातून अटक केली. तेव्हा त्याने सना यांच्या खुनाची कबुली दिली. सना खान यांची आई मेहरुनिता खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. जबलपूर येथे कुख्यात गुंड असलेल्या पप्पू याच्याशी सना खान यांचे संबंध होते. एक ऑगस्टला त्यांनी पप्पूला कॉल केला होता. तेव्हा त्यांचे आणि पप्पू भांडण झाले होते. त्यामुळे २ ऑगस्टला सना खान यांनी त्याला तडकाफडकी भेटण्याचे ठरविले. त्याच दिवशी त्या शेवटच्या ट्रॅव्हल्सने जबलपूरला निघाल्या. तेथून सकाळी घरच्यांशी बोलणे झाल्यावर दुपारी त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. २ ऑगस्टला त्यांच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात सना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखा पीएसआय शाहाकार यांच्या नेतृत्वात जबलपूरला पथक पाठविले. दरम्यान गुरुवारी गुन्हा दाखल केल्...

शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो.. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल स्पष्टच सांगितलं

Image
  गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याच्या काल बातम्या समोर आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या, वास्तविक असं काही नाही. मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये असताना अनेकदा प्रकल्पांच्या १५ दिवसांनी आढावा बैठका घेत होतो. त्या बैठकांमधुन प्रकल्पांना गती द्यायचे काम करायचो, आताही आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करतो' असं अजित पवार म्हणालेत. पुढे ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांनी सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. आम्ही सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास व्हावा, कामे व्हावी म्हणून आम्ही गेलो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी...

आता शिंदे यांच्या गटावर अजित पवारांचे अतिक्रमण..! शिंदेसेनेच्या मतदारसंघातही दौरे

Image
  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, अजित पवार गटाकडून राज्याचा दौरा करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदार संघांमध्येही राष्ट्रवादीचे मंत्री, नेते दौरे करणार असल्याने ठरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. काल (शुक्रवारी) मुंबईतील मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयामध्ये   अजित पवार   गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाचे नेते तसेच मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्ष वाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे,  अजित पवार  गटाकडून ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार आहे, त्यामध्ये शिंदे गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भाजपने काही महिन्यांआधीच शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाने मुख्य...

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..

Image
  मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे. महाविकास आघाड सत्तेत असतानाच मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित होतं. दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेतली नाही. त्यामुळे मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, शिंदे गट खासदारांवर करणार कायदेशीर कारवाई

Image
  लोकसभेत अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप पाठवला होता. मात्र ठाकरे गटाचे ५ खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. सोमवारी वकिलांशी चर्चा करून ठाकरे गटाच्या खासदारांना कायदेशीर नोटीस देणार आहोत. लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. त्यामुळे व्हीप भावना गवळी यांचाच लागू होतो, अशी माहिती  राहुल शेवाळे  यांनी दिली. काल गुरुवार अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील वॉक आउट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्टीकरण दिले. शेवाळे म्हणाले, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळं यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही.

शिवसेना शिंदे गट ‘कमळ’ चिन्हावर लढणार; अपात्रेतून वाचण्यासाठी गुगली..?

Image
    भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात एकहाती सत्ता आणावयाची आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली. शिवसेना शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. जळगाव जिल्हा त्यात आघाडीवर असेल. जिल्ह्यात सर्वांत जास्त शिवसेना गटाचे पाच आमदार आहेत. मात्र, यामुळे भाजपच्या त्या मतदारसंघातील इच्छुकांची मोठी अडचण होईल. भाजप आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करीत आहे. पक्षाला लोकसभा निवडणुकीत जास्तीत खासदार महाराष्ट्रातून द्यायचे आहेत.  ‘मिशन ४८’ टार्गेट निश्‍चित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला पूर्ण बहुमत तर हवेच आहे; परंतु २०० प्लसचे ‘टार्गेट’ ठेवण्यात आले. मध्यंतरी राज्यात काही माध्यमांचे सर्व्हे झाले. त्यानंतर भाजपला काही अंशी राज्यात आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व सतर्क झाले. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’ला झटका बसला व पक्षातून फुटून आमदार भाजपसोबत राज्यातील सत्तेत सहभागी झाले. राज्यात अगोदरच शिवसेना फुटून शिंदे गटाचे तब्बल ४० आमदार सोबत आल...

भारतरत्न माणसाला जुगाराची जाहिरात करणे शोभते का ? बच्चू कडूंचा सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम.!

Image
    राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार  बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सचिनने ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. सचिन तेंडूलकर  यांच्या घरी जाऊन प्रहार टाईप आंदोलन करणार आहोत. भारतरत्न असलेले सचिन तेंडूलकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहीजे. या भारताचा ते अभिमान आहेत. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी. भारतीयांची ऑनलाईन गेममधून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही सचिन तेंडूलकर यांना नारळ पाणी देऊ. पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, अशी जाहिरात करायची आणि दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असे धंदे सुरु आहेत. बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. शिंदेंना दिलेल्या पत्रात कडू म्हणाले,"सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत हो...

किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार? ईडीने मागवली कोविड घोटाळ्याची कागदपत्रं..

Image
 कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडीने देखील लक्ष घातले आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारावर आल्या आहेत. पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे ईडीने मागवल्याचे माहिती समोर आली आहे. ईडीने काल मुंबई पोलिसांकडून यासंबंधीचे कागदपत्रे मागवली आहेत. काही दिवसांपूर्वी बॉडी बॅगचा घोटाळा झाल्यासंदर्भात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याच धर्तीवर ईडी किशोरी पेडणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोरोना काळात बॉडी बॅग विकत घेताना जास्त दराने खरेदी झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता ईडीने या प्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्रे मागवल्याने चर्चेला उधाण आलं आहे. ईडीने कोविड घोटाळ्याची चौकशीदरम्यान बॉडी बॅग घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या घोटाळ्यामध्ये १७०० ते १८०० बाजारमुल्य असलेल्या बॉडी बॅग साडेसहा हजार ते ६८०० रुपयांनी विकत घेतल्याचा आरोप आहे.मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग दोन हजारांऐवजी ६८०० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हे क...

कोल्हापुरात अजित पवार तर सोलापुरात हसन मुश्रीफ फडकवणार 'तिरंगा'; शासनाकडून ध्वजवंदन यादी जाहीर

Image
    राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी व त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार अशी चर्चा असतानाच आता शासनाने स्वातंत्र्यदिनानिमित्त  जिल्हानिहाय ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात कोल्हापुरातील ध्वजवंदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफ  यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात ध्वजवंदन होणार आहे. सध्या मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही. महाविकास आघाडीच्या काळात पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जुलैत राष्ट्रवादीतून बंडखोरी करत  पवार  यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद दिले जाईल अशी शक्यता होती; पण सध्या तरी पालकमंत्री बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन होईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा मुख्यालयात होणारा ध्वजवंद...

जयप्रभा स्टुडिओ व्यवहार: राजेश क्षीरसागर, सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

Image
  राज्य शासनाच्या ताब्यातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार संस्थानकालीन अटी व शर्तींचा भंग करून झाला आहे. ५० कोटींची जागा साडेसहा कोटींत कशी घेतली? याची चौकशी करून जागेच्या व्यवहारातील प्रमुख व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करावी, तसेच एक साधा पानपट्टीचालक असलेल्या राऊत यांनी साडेसहा कोटींची रक्कम कोठून आणली, याची ‘ईडी’ने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मुख्यत: यासंबंधीची तक्रार केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी यावेळी उपस्थित होते. नगरविकास विभागाने महापालिकेला स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात दिलेले पत्र चुकीचे व बेकायदेशीर असल्यामुळे स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही घाईगडबडीने करण्यात येऊ नये. माझी त्यास हरकत आहे, अशा आशयाचे लेखी पत्र इंगवले यांनी जिल्हाधिकारी तथा प्रशासक राहुल रेखावार यांना मंगळवारी दिले. इंगवले म्हणाले, राज्य शासनाच्या ताब्यात असणारी जयप्रभाची जागा क्षीरसागर कुटुंब व पानप...

‘युतीसाठी माझा फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध’, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य..महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढेल?

Image
    राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांची निवडणूक  आगामी काळात पार पडणार आहे. याशिवाय देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून एनडीएमधील घटक पक्षांची एकत्रित बैठक घेतली जात आहे. तर दुसरीकडे देशभरातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येत आपल्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवलं आहे. इंडिया आघाडीत शिवसेना ठाकरे गट देखील आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतीलही पक्ष आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. एकीकडे आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांच्या गोटात हालचाली घडत असताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाड...

तीन महिने आम्ही वाट पाहतो, आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही सरकारकडे जाणार नाहीत, सरकार आमच्याकडे येईल..बच्चू कडू यांचा अमरावतीत एल्गार

Image
  आमदार बच्चू कडू  यांच्या नेतृत्वात अमरावतीत जन एल्गार मोर्चा काढण्यात आला. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाषण करताना बच्चू कडूंनी सरकारला मोठा इशारा दिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला मोठा इशारा दिला. “आजचा मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही. आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. आमचं नातं जात आणि धर्माशी नाही. तर आमचं नात दुःखी लोकांशी आहे. सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही का?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. “मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की पाठिंबा द्या. पण मोर्चा काढू नका. हा मोर्चा 50 हजार जणांचा आहे. पुढचा 5 लाख जणांचा असेल. दोन महिने झाले की सरकारकडे मागणी करा. 30 वर्षांपूर्वी काँग्रेस जे अनुदान देत होत ते अनुदान शिंदे सरकारने वाढवलं. कामे रोहयोमधून व्हावे. भाव देण्याची अवकात कोणत्याच सरकारची नाही म्हणून आम्ही स्वामीनाथन आयोगाची मागणी करत आहोत”, असं बच्चू कडू म्हणाले. ‘सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वखर वाहने नाही’ “साप चावल्यानंतर जर ...