अखेर आरोपीने दिली भाजपाच्या नेत्या सना खानच्या खुनाची कबुली..सहा महिन्यांपूर्वीच झाले होते सनाशी लग्न



 बलपुरला गेल्यावर बेपत्ता झालेल्या भाजपाच्या नेत्या सना खान यांचा अमित उर्फ पप्पू साहू यानेच खून केल्याची माहिती समोर आली आहे. मानकापूर पोलिसांनी त्याला शुक्रवारी सकाळी ११ वाजता जबलपूर येथील गोलबाजार परिसरातून अटक केली. तेव्हा त्याने सना यांच्या खुनाची कबुली दिली. सना खान यांची आई मेहरुनिता खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जबलपूर येथे कुख्यात गुंड असलेल्या पप्पू याच्याशी सना खान यांचे संबंध होते. एक ऑगस्टला त्यांनी पप्पूला कॉल केला होता. तेव्हा त्यांचे आणि पप्पू भांडण झाले होते. त्यामुळे २ ऑगस्टला सना खान यांनी त्याला तडकाफडकी भेटण्याचे ठरविले. त्याच दिवशी त्या शेवटच्या ट्रॅव्हल्सने जबलपूरला निघाल्या. तेथून सकाळी घरच्यांशी बोलणे झाल्यावर दुपारी त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. २ ऑगस्टला त्यांच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात सना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

तक्रार नोंदवताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखा पीएसआय शाहाकार यांच्या नेतृत्वात जबलपूरला पथक पाठविले. दरम्यान गुरुवारी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा कसून शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी जबलपूरच्या गोलबाजार परिसरात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी योजना आखून आरोपीला अटक केली. पोलिसी हिसका दाखल्यावर त्याने सना खान  यांच्या खुनाची कबुली दिली.

असा केला खून

जबलपूरला सना खान पोहोचल्यावर त्यांचे अमित उर्फ पप्पू शाहू याच्याशी कडाक्याचे भांडण झाले. रागात त्याने घरातील दांडाने सना यांच्या डोक्यावर चार वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत मृतदेह घरात ठेऊन सांयकाळी पप्पूने त्याचा नोकर सागर याच्यासह मृतदेह एका मोठ्या पिशवीत गाडीत ठेवला.  त्यानंतर सात किलोमीटर दूर असलेल्या हिरण नदीत तो फेकून दिला. यानंतर त्याने दमुआ येथी गाडी धुण्यासाठी नोकराला दिली. त्यावेळी डिक्कीत रक्त होते. गाडी स्वच्छ केल्यावर त्याचा नोकर सागर येथे निघून गेला आणि पप्पू तिथून कारसह फरार झाला होता.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें