सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

 


राज्यातील गरीब जनतेला ज्यांना केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेणं परवडतं. त्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इथं येणाऱ्या रुग्णाला प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

१५ ऑगस्टपासून लाभ

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध होणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टपासून याचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

आरोग्य मंत्र्यांचा पाठपुरावा

आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळावेत यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें