आता शिंदे यांच्या गटावर अजित पवारांचे अतिक्रमण..! शिंदेसेनेच्या मतदारसंघातही दौरे

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, अजित पवार गटाकडून राज्याचा दौरा करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदार संघांमध्येही राष्ट्रवादीचे मंत्री, नेते दौरे करणार असल्याने ठरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

काल (शुक्रवारी) मुंबईतील मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाचे नेते तसेच मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्ष वाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, अजित पवार गटाकडून ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार आहे, त्यामध्ये शिंदे गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भाजपने काही महिन्यांआधीच शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले आहेत.

दरम्यान, अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे राजकीय नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर महायुतीमध्ये अजित पवार यांच्या येण्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर काही नेत्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.

आता अजित पवार यांनी शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघात पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी दिसण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें