आंबोली घाटातील 'या' धबधब्याला ग्रामस्थांचा विरोध, सरपंचांनी फाडला 'बॅनर'..नावावरून वाद चिघळणार?

 


राज्याच्या पर्यटन विभागाने आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळच्या एका धबधब्याला ''बाहुबली'' हे नाव दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. आंबोली ग्रामस्थांनी या फिल्मी नावाला विरोध केला, तर पारपोली ग्रामस्थांनी आज या धबधब्याच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन मंत्र्यांची वाट न पाहता केले.

आंबोली घाटातील धबधब्याला दिलेल्या ‘बाहुबली’ या नावाबाबत येथील ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धबधब्यांना चित्रपटातील नावे देऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, याबाबत शालेयमंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आंबोली घाटात अनेक धबधबे आहेत. जवळपास सहा मोठ्या धबधब्यांसह असंख्य लहान धबधबे आहेत. सध्या ‘बाहुबली’ म्हणून गाजणाऱ्या धबधब्यापेक्षा मोठा धबधबा ज्या ठिकाणी दरड पडली, त्याच्या बाजूला आहे. तेथे जागाही विस्तीर्ण असून तो थेट कोसळणारा धबधबा आहे; मात्र याबाबत पर्यटक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
बाहुबली धबधबा रस्त्यानजीक असून, त्याचे अचानक उदघाटन करण्यामागे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आंबोली घाटातील धबधब्यांना नावे देण्याची गरज नसून, त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख गावकरी शशिकांत गावडे, शिवसेना उपसंघटक विशाल बांदेकर, सदस्य महेश पावसकर, काशिराम राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, संतोष पालेकर आदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. ग्रामपंचायतमध्येही तसा ठराव घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
आंबोली येथील बाहुबली धबधब्याचे आज पर्यटनमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते; मात्र पारपोली ग्रामस्थांनी लावलेला स्वागताचा बॅनर आंबोली सरपंचांनी फाडल्याचा आरोप करत मंत्र्यांआधी पारपोली सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनीच या धबधब्याचे उद्घाटन केले. पारपोली ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ वाढवून धबधब्याचा प्रारंभ करण्यात आला. पारपोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हा धबधबा येत असताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही. पारपोली ग्रामस्थांनी लावलेला स्वागताचा बॅनरही फाडण्यात आला, असा आरोप करत याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सदस्य प्रियांका गुरव, माजी उपसरपंच प्रमोद परब, हेमंत गावकर, दत्ताराम गावकर, दीपक पास्ते, विनायक गावकर, सोपान परब आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री शिंदे यांचा तानाजी सावंत यांना मोठा धक्का..! तानाजी सावंतांच्या 150 कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार