उत्कृष्ट तपासात महाराष्ट्राला मिळाला भोपळा; वरिष्ठांच्या वारंवार बदल्यांचा फटका? केंद्राने जाहीर केली यादी..
कधीकाळी स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना उत्कृष्ट तपासासाठी एकही पदक मिळालेले नाही. गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळत असताना महाराष्ट्र पोलिसांचे अपयश धक्कादायक असल्याची चर्चा ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत आहे
गृहमंत्रालयाने 2023 मध्ये उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली. त्यामध्ये यंदा राज्य पोलिंसासह मुंबई पोलिसांना एकही पदक मिळाले नाही. देशभरातील 140 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली.
महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले. मात्र महाराष्ट्राला यंदा पदकं मिळाले नाहीत. यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पोलिसांना 11 पदकं मिळाली होती. मात्र यंदा एकही पदकं मिळाली नाही. यंदा 140 पदकं विविध विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. मात्र महाराष्ट्रातील एकाही अधिकाऱ्यांचे यात नाव नाही.
वर्ष 2023 साठी "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपासासाठी" 140 पोलीस कर्मचार्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पदके देण्याचा उद्देश गुन्ह्याच्या तपासातील अधिकाऱ्यांना मानकांन, प्रोत्साहन देणे आणि तपासातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याचा आहे. दरवर्षी 12 ऑगस्टला याची घोषणा केली जाते. 09 केरळ आणि राजस्थान, 08 तामिळनाडू, 07 मध्य प्रदेश आणि 06 गुजरात आणि उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये 22 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तपास अधिकाऱ्यांनी केलेले काम संकलित करून केंद्रीय ग्रह विभागाकडे पाठवणे व त्याला मान्यता मिळेल, याची खात्री करणे हे पोलिस महासंचालक कार्यालयाचे कर्तव्य आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे याकडे संबंधितांचे पुरेसे लक्ष वेधले गेले नसल्याचे दिसून येते. - प्रवीण दीक्षित, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक.
Comments
Post a Comment