भारतरत्न माणसाला जुगाराची जाहिरात करणे शोभते का ? बच्चू कडूंचा सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम.!
राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सचिनने ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
सचिन तेंडूलकर यांच्या घरी जाऊन प्रहार टाईप आंदोलन करणार आहोत. भारतरत्न असलेले सचिन तेंडूलकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहीजे. या भारताचा ते अभिमान आहेत. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी.
भारतीयांची ऑनलाईन गेममधून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही सचिन तेंडूलकर यांना नारळ पाणी देऊ. पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, अशी जाहिरात करायची आणि दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असे धंदे सुरु आहेत.
बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
शिंदेंना दिलेल्या पत्रात कडू म्हणाले,"सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत."
Comments
Post a Comment