अजित पवार-शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक; काका-पुतण्यामध्ये चर्चा..


 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात काका शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघांमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काही माध्यमांनी अजित पवारांचा बंगल्यामधील व्हिडीओदेखील चालवला.

पुण्यातल्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा सर्किट हाऊसकडे रवाना झाला. मात्र त्यानंतर ताफा तिथेच ठेवून अजित पवार एका गाडीत बसून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले.

मीडिया रिपोर्टनुसार तिथे शरद पवार उपस्थित होते. काका-पुतण्यामध्ये चर्चा झाली आणि नंतर अजित पवार बाहेर पडले. विशेष म्हणजे काहींच्या मते जयंत पाटील हेदेखील बैठकीसाठी उपस्थित होते. अधिकृत माहिती मात्र मिळू शकलेली नाही.अजित पवार यांची गाडी बंगल्याबाहेर पडत होती, त्यावेळी चालकाच्या चुकीमुळे गाडी गेटला धडकली. तरीही गाडी थांबली नाही तशीच निघून गेली. मागच्या सीटवर कुणीतरी झोपलेलं होतं. तेच अजित पवार असल्याचा दावा माध्यमं करीत आहेत.

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितलं की, भेट झाल्याची कसलीही माहिती मला नाही. जर भेट झालीच असेल तर ती कौटुंबिक असेल. काका-पुतण्याची भेट झाली तर त्यात वावगं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांची कथित गाडी बंगल्याबाहेर पडल्यानंतर पुन्हा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येतंय. काका-पुतण्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि ही भेट उद्योगपतींच्या घरीच का झाली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..