Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..

 मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.

महाविकास आघाड सत्तेत असतानाच मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित होतं.

दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेतली नाही. त्यामुळे मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय