ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, शिंदे गट खासदारांवर करणार कायदेशीर कारवाई
लोकसभेत अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप पाठवला होता. मात्र ठाकरे गटाचे ५ खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
सोमवारी वकिलांशी चर्चा करून ठाकरे
गटाच्या खासदारांना कायदेशीर नोटीस देणार आहोत. लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. त्यामुळे व्हीप भावना गवळी यांचाच लागू होतो, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.
काल गुरुवार अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील वॉक आउट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्टीकरण दिले. शेवाळे म्हणाले, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळं यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही.
Comments
Post a Comment