धक्कादायक ! छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू..

 


ठाणे महानगरपालीकेच्या कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा प्रकारामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हड प्रचंड संतापले होते.

प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. रुग्णालयातील प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.तर 10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी आव्हाडांनी ट्विट करत रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली, असं म्हटलं होतं.


Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें