'हे देवा, देशाला वाचव'; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान मोदींवर टीका


  मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीतून सरन्यायाधीश यांना वगळल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. देश अव्यवस्थेकडे जात आहे असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र आणत असलेल्या नव्या विधेयकाचा विरोध केला. निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमध्ये सरन्यायाधीशांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या आहे. 

ममता बॅनर्जी यांनी ट्विटकरुन यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. देश अव्यवस्थेकडे जात आहे. तीन सदस्यीय समितीमध्ये सरन्यायाधीशांची भूमिका निर्णायक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्र्याचा समितीमध्ये समावेश करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक सादर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात या विधेयकावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड करण्याच्या समितीत तीन सदस्य असावेत. ज्यात पंतप्रधान, विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान नियुक्त केंद्रीय मंत्री असेल असे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. याआधीच्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश होता.पण, आता नव्या विधेयकात सरन्यायाधीशांना वगळून पंतप्रधान नियुक्त केंद्रीय मंत्री असणार आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त निवडीमध्ये आपसूकच केंद्र सरकारचे पारडे जड होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उटवली आहे. २०१२ मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करण्याचे सुचवले होते.पण, आता भाजप अडवाणी यांच्याच विचारांना विसरत आहे, अशी टीका काँग्रसने केलीये. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नवीन विधेयक संविधानावर केलेला हल्ला आहे. लोकांना त्यांचे सरकार निवडण्याचा अधिकार आहे. पण, सरकार निवडणूक आयुक्तांना आपल्या हातातील बाहुले बनवू पाहात आहे. 

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें