पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा..
पंतप्रधान पदावर असताना पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. मंगळवारचा त्यांचा पुणे दौरा हा सन २०१४ ते सन २०२३ या नऊ वर्षातला हा त्यांचा ५ वा दौरा ठरणार आहे. त्यांच्या आधी पंडित नेहरू ४ वेळा, इंदिरा गांधी ३ वेळा तर राजीव गांधी २ वेळा पंतप्रधान असताना पुण्यात आले होते. मोरारजी देसाई, पी. व्ही. नरसिंहराव, एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल यांनीही पंतप्रधान असताना पुणे शहराला भेट दिली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या पुण्यातील दोन्ही राष्ट्रीय संस्थांचे लोकार्पण पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते झाले होते. एनडीएसाठी ते सन १९५७ आणि एनसीएलसाठी १९५८ मध्ये आले होते. त्यानंतर एकदा रशियाचे पंतप्रधान ख्रुश्चेव यांना घेऊन नेहरू पुण्यात आले होते. टिळक रस्त्यावरून खुल्या गाडीतून त्यांनी नागरिकांना अभिवादन केले होते. त्यानंतरची त्यांची पुणे भेट १२ जुलै १९६१ च्या पानशेतच्या पुरात सर्वस्व हरवलेल्या पुणेकरांच्या सांत्वनासाठीची होती. खुल्या जीपमधून नेहरूंनी त्यावेळी पूरग्रस्त भागाला भेट दिली. तत्कालीन महापौर रोहि...