मोदींना ३६ पक्षांची गरज काय? ED-CBI-IT पुरेसं; उद्धव ठाकरेंचा एनडीएवर हल्लाबोल..

 


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी 'इंडिया' नावाची आघाडी स्थापन केली. त्याचदिवशी केंद्रातील मोदी सरकारने अनेक वर्षांनंतर एनडीएची बैठक बोलवली होती. या बैठकीत एनडीएचे ३८ राजकीय पक्ष सोबत आले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षानंतर एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. देशभक्त विरोधकांनी तयार केलेल्या इंडिया नावाच्या आघाडीला उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना आठवणीतील गोष्टी आठवल्या. त्यासाठी त्यांनी एनडीएतील ३६ पक्षांची जेवणावळ घातली.

खरं तर ३६ पक्षांची गरज नाही. त्यांच्या ईडी, इन्कमटॅक्स आणि सीबीआय तीन पक्ष मजबूत आहेत. अनेक पक्षांचा एकही खासदार नाही. आपल्यातले काही गद्दार तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएमध्ये तीनच पक्ष शिल्लक राहिलेले आहेत, असंही उद्धव यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरही भाष्य केलं. त्या अपघातातील मृतांच्या चिता पेटलेल्या असताना हे शपथविधी करत होते. संवेदनाच राहिल्या नाही. यावर प्रतिक्रिया देण्यास शब्दच नाही. आता शेवटची आशा राहिली ती जनतेकडूनच. हे देश त्यांचा आहे. अनेक क्रांतीकारकांनी बलिदान देऊन देश उभारला. देश म्हणजे, माणसे आहेत. याच देशाला वाचविण्यासाठी इंडिया ही आघाडी उभी राहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें