भाई जगतापांचा रुसवा फडणविसांनी काढला पण, विधानपरिषदेत निलम गोऱ्हे भडकल्या...
महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. विरोधक आणि सत्ताधारी अनेक मुद्द्यांवर भांडताना दिसले. आज विधान परिषदेत चांगलाच गोंधळ झाला. सभागृहात भाई जगताप यांना निलम गोऱ्हे यांनी बोलू न दिल्याने मोठा राडा झाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाई जगताप यांची समजूत काढत त्यांना बोलण्याची विनंती केली. तरी निलम गोऱ्हे यांच्या दिशेने हात करत भाई जगताप यांनी संतापाने आपलं म्हणणे मांडने टाळले. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.
निलम गोऱ्हे यांच्यात खूप बदल झाला आहे. आता त्यांना जे काम दिलं आहे ते इमाने इतबारे करत आहेत, असा टोला भाई जगताप यांनी निलम गोऱ्हे यांना लगावला. यानंतर निलम गोऱ्हे देखील संतापल्या.
मी कुणालाही जाणीवपूर्वक थांबवत नाही. माझं काम मी करत आहे. उगाच राजकिय शेरेबाजी करू नका. जाणीवपूर्वक मला बोललेले चालणार नाही. भाई जगताप तुम्ही एकटेच बोलतं बसा. मी माझे अधिकार वापरणार मी काही कमकुवत नाही, असे म्हणत निलम गोऱ्हे यांनी भाई जगताप यांना फटकारले.
विधानसभेत देखील काँग्रेस आमदारांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. विरोधकांमध्ये काँग्रेस सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते देखील आता काँग्रेसचा असणार आहे. नाना पटोले, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर पावसाळी अधिवेशना आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत.
Comments
Post a Comment