"आम्हाला गोव्याला घेऊन जा...", परबांची मागणी? निलम गोऱ्हे म्हणाल्या तुम्ही रिसॉर्ट सुचवा...
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. आज विधानपरिषदेत चांगलाच गोंधळ झाला. राज्याचे शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीबाबत अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा करतांना परब आणि केसरकर यांच्यात टोलेबाजी झाली. यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी देखील वक्तव्य केले.
शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अब्दुल्ला खान दुर्रानी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. मात्र उत्तरात समाधानी न झालेल्या आमदारांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अनिल परब यांनी सूचना करताना केसरकर यांना चिमटा काढाला.
ही बैठक गोवा- सिंधुदुर्ग घेण्यात यावी. मागे देखील आपण काही आमदारांची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. हे आम्हाला माहित आहे. आता आम्हालाही घेऊन जावा आणि आमच्याही शंकेचे निरासन करावे असा चिमटा काढला.
निलम गोऱ्हे यांनी सर्व आमदारांचे मते जाणून घेतले. यावेळी अनिल परब सतत हात वर करत होते. यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या, परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?, त्यावर परब म्हणाले माझी सुचना आहे. परब म्हणाले तुमचा अभ्यास असेल तुम्ही रिसॉर्ट वैगेर नंतर सांगा.
Comments
Post a Comment