जयपुर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; घटनेत एका पोलीसासह ४ जणांचा मृत्यू


 जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. यामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका आरपीएफच्या जवानाचाही समावेश आहे. वापी आणि पालघर दरम्यान ही घटना घडली आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.

घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. सध्या ही मुंबई सेंट्रल येथे थांबवण्यात आली आहे. तर हा गोळीबार एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

चेतन सिंह नावाचा आरपीएफचा जवान जो एस्कॉर्ट ड्युटी वरती होता त्याने एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गोळाबार करणाऱ्या चेतन सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन सिंग याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची माहितीही समोर आली आहे. तर मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ज्या डब्यात ही घटना घडली, तो डबा पोलिसांकडून सिल करण्यात आला आहे. पोलीस सर्व तपास करत आहेत. गोळीबार का केला, याबाबत तपासाअंतीच स्पष्ट होईल. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.

कॉन्स्टेबलने हा गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजरमध्ये अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांना उतरवत तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें