मुख्यमंत्री शिंदे यांचा तानाजी सावंत यांना मोठा धक्का..! तानाजी सावंतांच्या 150 कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती
पालकमंत्रीपद पण निधीच नाही, तानाजी सावंतांच्या 150 कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निधीवरुन वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत हे शिंदे गटाच्या नेत्यांना डावलून भाजप आणि विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना अधिकचा निधी देत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतची तक्रार देखील देखील करण्यात आली होती. या संपुर्ण प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंत यांना मोठा धक्का दिला आहे. सावंत यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना शिंदे यांनी स्थगिती दिल्याची माहीती समोर आली आहे.
तानाजी सावंत यांच्या विरोधात त्यांच्याच शिवसेनेचे नेते उभे राहिले आहेत, पालकमंत्री असताना शिवसेनेला वगळून विरोधी पक्षांसह भाजपला सर्वाधिक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
त्यानंतर आता परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या 149 कामांना मुख्यमंत्र्यांनी लाल झेंडा दाखवला आहे. सावंतांनी मंजूर केलेल्या कामांवर त्यांच्याच शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.
त्याचबरोबर तानाजी सावंत यांची तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फोन करत हे काम काही दिवस थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासनही शिंदेंनी दिल्याची माहिती स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे.
दरम्यान, नुकत्याच 150 कोटी मंजूर झालेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालकमंत्री तानाजी सावंतांना मोठा धक्का मानला जात आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
Comments
Post a Comment