"भारत जगात 'टॉप 3' मध्ये असेल याची गॅरंटी"; तिसऱ्या टर्मचा उल्लेख करत PM मोदींनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग

 


लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे आता वाहायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधकांची एकजूट निश्चित झाली. त्यानंतर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीचं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.

दिल्लीत जगातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या तिसऱ्या टर्मचा उल्लेख करत भारत जगातील टॉप ३ अर्थव्यवस्थांमध्ये असेल अशी गॅरंटी दिली. 

"मी देशाला हा देखील विश्वास देतो की तिसऱ्या टर्ममध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये एक नाव भारताचं असेल. म्हणजेच तिसऱ्या टर्ममध्ये पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत भारत गर्वानं उभा असेल. थर्ट टर्ममध्ये टॉप तीन अर्थव्यवस्थेत भारत पोहोचलेला असेल आणि ही मोदीची गॅरंटी आहे" अशा प्रकारे सलग तीन वेळेला आपल्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्मचा उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला.

जगातील सर्वात मोठं म्युझिअम उभारणार

मी देशवासियांना याचाही विश्वास देऊ इच्छितो की, २०२४ नंतर माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची विकास यात्रा आणखी वेगानं वाटचाल करेल, असंही पुढे मोदी म्हणाले. दिल्लीत याच ठिकाणी कर्तव्य पथाजवळ जगातील सर्वात मोठं म्युझिअम उभारणार असल्याची घोषणा देखील यावेळी PM मोदींनी केली.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें