प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी उठवली..
यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला कोणतीही बंदी नाही, मात्र या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत केलं. यासाठी कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, यामुळं मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत आहे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली होती, त्याला केसरकर उत्तर देत होते. मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या रंगांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं.
Comments
Post a Comment