कसली मुलाखत, ही तर मळमळ; भाजपची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका



शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाठिंत खंजीर खुपसण्याच्या दाव्यावर हल्लाबोल केला. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे ठसे पुसणार नाहीत. ही कसली मुलाखत...ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या "कलंका"तून बाहेर पडण्याची ही धडपड असल्याचंही शेलार यांनी म्हटलं.

भरलेला डालड्याचा डबा उपयोगाला तरी येतो, रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस. हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस अशा जहरी शब्दात शेलार यांनी ट्विट केलं.

पाठित खंजीर खुपसण्याच्या मुद्दावर राष्ट्रवादीने काय केलं, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला होता. उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीवरही निशाणा साधला होता.


Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें