दत्ता सामंत खून प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता..
कामगार नेते दत्ता सामंत यांच्या २६ वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. विशेष सीबीआय कोर्टानं राजनची या प्रकरणातून सबळ पुराव्यांअभावी शुक्रवारी सुटका केली.
सुत्रांच्या माहितीनुसार, विशेष सीबीआय कोर्टाचे न्या. ए. एम. पाटील यांनी या प्रकरणावर निकाल देताना छोटा राजनची निर्दोष सुटका केली. राजन याच्याविरोधात सरकारी वकिलांना कोणतेही सबळ पुरावे सादर करता आले नाहीत, त्यामुळं त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
फिर्यादींनी सांगितंल की ४ अनोखळी व्यक्त बाईकवरुन आले आणि त्यांची गाडी अडवली. या दुचाकीस्वारांनी युनियन लिडर दत्ता सामंत यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. डॉ. सामंत यांना नजिकच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये उपचारासाठी नेण्यात आले, जिकडे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आलं.
हा गुन्हा साकीनाका पोलीसांच्या हद्दीत घडला होता. त्यानंतर साकीनाका पोलीसांनी डॉ.दत्ता सामंत यांचे ड्रायव्हर भीमराव सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरुन चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.यावेळी दत्ता सामंत यांच्या चालकालाही तोंडावर आणि मानेवर गंभीर इजा झाली होती.
सुरुवातीच्या काही सुनावणींमध्ये स्थानिक लोकांवर गुन्हा दाखल करुन, त्यांच्यावर खटला चालवून २०००साली निकाल देण्यात आला होता. त्यानंतर राजन विरुद्धच्या या खटल्यामध्ये दुसरा गुंड गुरु साटम आणि राजनचा विश्वासू गुंड रोहित वर्मा यांना फरार घोषित करुन, त्यांच्यावर वेगळा खटला सुरु करण्यात आला.
राजनला ऑक्टोबर,२०१५मध्ये इंडोनेशियाच्या बालीमधून अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने त्याची कस्टडी घेतली आणि डॉ सामंत यांच्या खूनाचा खटला त्याच्यावर चालण्यात आला.
Comments
Post a Comment