Posts

उत्कृष्ट तपासात महाराष्ट्राला मिळाला भोपळा; वरिष्ठांच्या वारंवार बदल्यांचा फटका? केंद्राने जाहीर केली यादी..

Image
  कधीकाळी स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना उत्कृष्ट तपासासाठी एकही पदक मिळालेले नाही. गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळत असताना महाराष्ट्र पोलिसांचे अपयश धक्कादायक असल्याची चर्चा ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत आहे गृ हमंत्रालयाने 2023 मध्ये उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली. त्यामध्ये यंदा राज्य पोलिंसासह मुंबई पोलिसांना एकही पदक मिळाले नाही. देशभरातील 140 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली.  महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले. मात्र महाराष्ट्राला यंदा पदकं मिळाले नाहीत. यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पोलिसांना 11 पदकं मिळाली होती. मात्र यंदा एकही पदकं मिळाली नाही. यंदा 140  पदकं विविध विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. मात्र महाराष्ट्रातील एकाही अध...

अजित पवार-शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक; काका-पुतण्यामध्ये चर्चा..

Image
  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात काका शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघांमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काही माध्यमांनी अजित पवारांचा बंगल्यामधील व्हिडीओदेखील चालवला. पुण्यातल्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा सर्किट हाऊसकडे रवाना झाला. मात्र त्यानंतर ताफा तिथेच ठेवून अजित पवार एका गाडीत बसून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले. मीडिया रिपोर्टनुसार तिथे शरद पवार उपस्थित होते. काका-पुतण्यामध्ये चर्चा झाली आणि नंतर अजित पवार बाहेर पडले. विशेष म्हणजे काहींच्या मते जयंत पाटील हेदेखील बैठकीसाठी उपस्थित होते. अधिकृत माहिती मात्र मिळू शकलेली नाही. अजित पवार यांची गाडी बंगल्याबाहेर पडत होती, त्यावेळी चालकाच्या चुकीमुळे गाडी गेटला धडकली. तरीही गाडी थांबली नाही तशीच निघून गेली. मागच्या सीटवर कुणीतरी झोपलेलं होतं. तेच अजित पवार असल्याचा दावा माध्यमं करीत आहेत. अजित पवार गटाचे आमदा...

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Image
  राज्यातील गरीब जनतेला ज्यांना केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेणं परवडतं. त्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इथं येणाऱ्या रुग्णाला प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. १५ ऑगस्टपासून लाभ आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध होणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टपासून याचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. आरोग्य मंत्र्यांचा पाठपुरावा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळावेत यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

'हे देवा, देशाला वाचव'; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

Image
    मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीतून सरन्यायाधीश यांना वगळल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. देश अव्यवस्थेकडे जात आहे असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र आणत असलेल्या नव्या विधेयकाचा विरोध केला. निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमध्ये सरन्यायाधीशांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या आहे.   ममता बॅनर्जी  यांनी ट्विटकरुन यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. देश अव्यवस्थेकडे जात आहे. तीन सदस्यीय समितीमध्ये सरन्यायाधीशांची भूमिका निर्णायक आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्र्याचा समितीमध्ये समावेश करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक सादर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात या विधेयकावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड करण्याच्या समितीत तीन सदस्य असावेत. ज्यात पंतप्रधान, विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान नियुक्त केंद्रीय मंत्री असेल असे विधेयक राज्यसभेत सादर कर...

"...आम्ही काय बेअक्कल आहेत का?"; पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार संतापले!

Image
  पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचं आज (१२ ऑगस्ट) लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच कोल्डवॉर सुरू असल्याचा दावा कारणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधकांना काही उद्योग उरला नाही अशा शब्दात अजित पवारांनी टीका केली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा होती. मुख्यमंत्री देखील एकदा चांदणी चौकातील वाहतुक कोंडीत अडकले होते. या चांदणी चौकाने कोणालाच सोडलं नाही. सगळ्यांना कमी अधी प्रमाणात या वाहतुक कोंडीने केला असल्याचे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री तब्येतीच्या कारणाने येऊ शकले नाहीत याची नोंद घ्यावी. कारण आलीकडे रुसून गेले, फुगून गेले असं सांगितलं जातं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांचं काम चांगलं सुरू आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस एका बाजूला होतेच. दुसरी बाजू मोकळी होती तिथं मी जाऊन उभा राहिलो.आता दोघंही त्यांच्या बरोबर आहेत...

अखेर आरोपीने दिली भाजपाच्या नेत्या सना खानच्या खुनाची कबुली..सहा महिन्यांपूर्वीच झाले होते सनाशी लग्न

Image
  ज बलपुरला गेल्यावर बेपत्ता झालेल्या भाजपाच्या नेत्या सना खान यांचा अमित उर्फ पप्पू साहू यानेच खून केल्याची माहिती समोर आली आहे. मानकापूर पोलिसांनी त्याला शुक्रवारी सकाळी ११ वाजता जबलपूर येथील गोलबाजार परिसरातून अटक केली. तेव्हा त्याने सना यांच्या खुनाची कबुली दिली. सना खान यांची आई मेहरुनिता खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. जबलपूर येथे कुख्यात गुंड असलेल्या पप्पू याच्याशी सना खान यांचे संबंध होते. एक ऑगस्टला त्यांनी पप्पूला कॉल केला होता. तेव्हा त्यांचे आणि पप्पू भांडण झाले होते. त्यामुळे २ ऑगस्टला सना खान यांनी त्याला तडकाफडकी भेटण्याचे ठरविले. त्याच दिवशी त्या शेवटच्या ट्रॅव्हल्सने जबलपूरला निघाल्या. तेथून सकाळी घरच्यांशी बोलणे झाल्यावर दुपारी त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. २ ऑगस्टला त्यांच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात सना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखा पीएसआय शाहाकार यांच्या नेतृत्वात जबलपूरला पथक पाठविले. दरम्यान गुरुवारी गुन्हा दाखल केल्...

शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो.. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल स्पष्टच सांगितलं

Image
  गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याच्या काल बातम्या समोर आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या, वास्तविक असं काही नाही. मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये असताना अनेकदा प्रकल्पांच्या १५ दिवसांनी आढावा बैठका घेत होतो. त्या बैठकांमधुन प्रकल्पांना गती द्यायचे काम करायचो, आताही आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करतो' असं अजित पवार म्हणालेत. पुढे ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांनी सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. आम्ही सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास व्हावा, कामे व्हावी म्हणून आम्ही गेलो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी...