Posts

'मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटतेय', नेत्यांने उपस्थित केली शंका

Image
  राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. त्याचबरोबर मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली आणि दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्यात सुरू असणाऱ्या गाठीभेटींमुळे त्याच्या भूमिकेबाबत अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. दरम्यान संपुर्ण प्रकरणावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी अशीच शंका व्यक्त केली आहे. मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटत आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. नातेसंबंध असले तरी याबाबत स्पष्टता हवी, ती भूमिका यातून सध्या तरी स्पष्ट दिसत नाही त्यांनी कठोर भूमिका घ्यावी असंही  राजू शेट्टी  म्हणाले आहेत. तर 'अ ला विरोध करायचा म्हणून ब सोबत जाणं योग्य आहे. या मताचा मी नाही. आमचा महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे', असंही राजू शेट्टी पुढे म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नित...

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

Image
  राज्याच्या राडकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आधी शिवसेनेत बंड झालं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप यांनी सरकार स्थापण केलं. या सरकारला १ वर्ष होताच राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी झाली. त्यानंतर अनेकांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागलं. त्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदारांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. अशातच मंत्रिपदाच्या रांगेत असलेले आमदार भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारा बाबतचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. आपल्याला मंत्रिपदाने कशी हुलकावणी दिली, याबाबत माहिती त्यांनी अलिबागमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. भरत गोगावले बोलताना म्हणाले की, 'मंत्रिपदासाठी माझाच नंबर पहिला होता, पण जेव्हा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च अडचणीत आले, तेव्हा मात्र मी माघार घेतली', हे सांगत असतानात त्यांनी राजकीय पडद्यामागे नेमके काय घडत होतं, याबाबतचं वर्णन त्यांनी केलं आहे. पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, 'पहिल्या नऊ जणांच्या यादीत मंत्रीपद मला मिळणार होतं, मात्र आमच्यातल्या एका सहकारी आमदाराने सांगितलं मला मंत्रीपद दिलं नाही तर माझी...

कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी.!लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना उतरवणार रिंगणात..?

Image
  ‘गेल्या पाच वर्षांत मतदारसंघ ज्यांना दिसला नाही, त्या संजय मंडलिकांना  संसदरत्न पुरस्कार मिळालाच कसा?, ’ असा सवाल करत खासदार मंडलिक यांचे नाणे आता गुळगुळीत झाले आहे, अशी टीका काँग्रेसकार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्याच कार्यकर्ता किंवा नेत्यालाच लोकसभेची उमेदवारी द्यावी. उसना किंवा आयात केलेल्या उमदेवाराचा विचार करू नये. काँग्रेसशी निष्ठावंत असणारे आमदार पी. एन. पाटील आणि आमदार  सतेज पाटील  यांच्यापैकी एका नेत्याला कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आढावा बैठक घेतली. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपली स्पष्ट आणि सडेतोड मते मांडली. माजी नगरसेविका भारती पवार म्हणाल्या, ‘जिल्ह्यात भाजपची टक्केवारी नगण्य आहे, तरीही भाजपची टक्केवारी वाढवण्यासाठी संभाजी भिडेंसारखा माणूस ग्रामीण भागातून फिरवण्याचे काम भाजप करत आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात न दिसलेल्या खासदार संजय मंडलि...

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

Image
  काल पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची एक गुप्त बैठक उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाली. आज जयंत पाटलांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी शरद पवारांनी मात्र ही भेट गुप्त नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांनाच चिमटा काढला. शनिवारी पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आज शरद पवार सांगोल्यात होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. कुटुंबातील व्यक्तीने वडीलमाणसाला भेटण्यात गैर काय? ते पुढे म्हणाले की, आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय हे खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ तारखेला मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये होणार आहे. ३० ते ४० वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत. मी, उद्धव ठाक रे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजित पवारांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी त्यांना पुन्हा विचारलं. अजित पवार तुमचे प...

मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस..

Image
 राज्यातील राजकारणात कधी काय होईल हे सांगणे अनेकांना कठीण जातंय. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक झाली. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. जवळपास ४ तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जाते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. काका-पुतण्याच्या या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र आता या भेटीनंतर जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. भगतसिंग पाटील हे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. भगतसिंग पाटील यांच्यासोबत जयंत पाटलांच्या आणखी काही निकटवर्तीयांना नोटीस पाठवली आहे. ईडीच्या नोटीस मिळाल्यानंतर अनेकांनी सत्तेसोबत जुळवून घेतले आहे. याआधी हसन मुश्रीफांनाही ईडीची नोटीस आली होती. त्याचसह जयंत पाटील यांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. त्यात मुश्रीफांनी अजित पवारांसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांचीही ईडी चौकशी झाली आहे. अलीकडेच अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा जयंत पाटील आणि शाह यांच्या बैठक झाल्याची बातमी...

धक्कादायक ! छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू..

Image
  ठाणे महानगरपालीकेच्या कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा प्रकारामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हड प्रचंड संतापले होते. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 13 रुग्ण हे आयसीयू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. रुग्णालयातील प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा क...

आंबोली घाटातील 'या' धबधब्याला ग्रामस्थांचा विरोध, सरपंचांनी फाडला 'बॅनर'..नावावरून वाद चिघळणार?

Image
  राज्याच्या पर्यटन विभागाने आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळच्या एका धबधब्याला ''बाहुबली'' हे नाव दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे. आंबोली ग्रामस्थांनी या फिल्मी नावाला विरोध केला, तर पारपोली ग्रामस्थांनी आज या धबधब्याच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन मंत्र्यांची वाट न पाहता केले. आंबोली घाटातील धबधब्याला दिलेल्या ‘बाहुबली’ या नावाबाबत येथील ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धबधब्यांना चित्रपटातील नावे देऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, याबाबत शालेयमंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंबोली घाटात अनेक धबधबे आहेत. जवळपास सहा मोठ्या धबधब्यांसह असंख्य लहान धबधबे आहेत. सध्या ‘बाहुबली’ म्हणून गाजणाऱ्या धबधब्यापेक्षा मोठा धबधबा ज्या ठिकाणी दरड पडली, त्याच्या बाजूला आहे. तेथे जागाही विस्तीर्ण असून तो थेट कोसळणारा धबधबा आहे; मात्र याबाबत पर्यटक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. बाहुबली धबधबा रस्त्यानजीक असून, त्याचे अचानक उदघाटन करण्यामागे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आंबोली घाटातील धबधब्यांना नावे देण्याची ...