Posts

'पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय', मनसेचं भाजपला प्रत्युत्तर..

Image
  गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नेत्यांनी दौरे, बैठका सुरू केल्या आहेत. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे दौऱ्यावर असताना सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांची गाडी अडवली होती म्हणुन फोडला होता. टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाला, म्हणून टोल नाका फोडला असं मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे होतं. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास थांबवल्याचा आरोप करण्यात आला होता. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला होता. दरम्यान मनसैनिकांनी केलेल्या या तोडफोडीवर आता भाजपाने ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यासंबधीचा एक एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये भाजपाने थेट अमित ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. भाजपच्या या ट्विटनंतर मनसेने ट्विट करुन पुन्हा भाजपला डिवचलं आहे. बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? असा सवाल विचार...

महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसाठी तातडीचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश..

Image
  जिल्ह्यांत 2019 आणि 2021 मध्ये ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 52 फूट झाली होती. त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या-ज्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं, त्या सर्व कुटुंबांनी आज 25 जुलै 2023 रोजी सायंकाळपर्यंत सर्व साहित्यांसह स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या  सूचना मिळताच या सर्वांचे निवारागृहात किंवा शिबिरामध्ये स्थलांतर केलं जाणार आहे. त्यामुळं स्थलांतरित होण्यासाठी आजच सर्व तयारी करून ठेवावी, असंही   जिल्हाधिकारी   राहुल रेखावार यांनी सांगितलंय. जिल्ह्यातील  राधानगरी  आणि काळम्मावाडी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 94 टक्के पर्यंत भरले आहे. त्यामुळं पंधरा दिवसांपूर्वी धरणे भरतील की नाहीत अशी परिस्थिती असताना आठवड्यामध्ये ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. राधानगरी धरण 8.36 टीएमसी पैकी 7.82 टीएसमी (93.55 टक्के) भरले. काळम्मावाडी (दूधगंगा) धरण 25.39 टीएमसी पैकी 13.10टीएमसी (51.58 टक्के) भरले. वारणा (शिराळा) धरण 34.39 टीएमसी पैकी 26....

"जीवनशैलीची एैशी तैशी, पण अपार सहनशीलता"; लोकल प्रवासातील आ.तांबेंचा अनुभव

Image
    नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे हे विधानभवनात जाण्यासाठी रस्तामार्गाने प्रवास करत होते. भिवंडीजवळ वाहतूक कोंडीत ते अडकले, कसेबसे कल्याण गाठले.मात्र मुंबई पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास केला. सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजीत तांबे यांनी या अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमवारीही ते संगमनेरहून अधिवेशनासाठी गाडीने निघाले होते. मात्र नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडीजवळ ते तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात की, शेवटी मित्राने कल्याणवरून लोकल ट्रेनने मुंबई गाठण्याचा सल्ला दिला. मात्र, भिवंडी बायपासवरून कल्याणपर्यंतचे ३० मिनिटांचे अंतर कापायलाही त्यांना तीन तास लागले. शेवटी कल्याणवरून त्यांना एसी लोकल मिळाली. या एसी लोकलमध्ये बसल्यावर त्यांनी स्वत:चा फोटो काढत ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी #शहर_विकास हा हॅशटॅग वापरत मुंबईकरांबद्दल प्रचंड आदर व्यक्त केला. ते म्हणतात, मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघरपासून पनवेलपर्यंत आणि कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर...

"काय दाखवतो..? मी संजय शिरसाट आहे एवढं लक्षात ठेव"; शिरसाट पवार जुंपली

Image
 राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील MIDC च्या प्रश्नावरुन थेट विधिमंडळातच उपोषणाचा मार्ग अवलंबला. आमदार पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील तरुणांसाठी एमआयडीसी मंजूर करावी म्हणत उपोषण केले. त्यावरुन, सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्यात, आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांची आठवण करुन दिली. त्यावर, रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना सुनावलं. त्यानंतर, आता शिरसाट यांनीही पुन्हा पलटवार केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावर आंदोलन केले. विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बॅनर घेऊन रोहित पवार बसले. आश्वासन देऊनही सरकार प्रश्न मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला सरकार बळी पडलंय. त्यामुळे उपोषण करण्याचा निर्धार रोहित पवारांनी केला. त्यावर सभागृहात अजित पवार यांनी रोहित पवारांना फटकारले. तर, संजय शिरसाट यांनीही सल्ला आणि इशाराही दिला. रोहित हा माझा मित्...

शरद पवार गटातील आमदारांना लागले सत्तेचे वेध?; अजितदादांसोबत जाण्याचा आग्रह

Image
  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांमध्ये 2 गट पडल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील काही आमदारांना आता सत्तेत जाण्याचे वेध लागले आहेत. मतदारसंघ वाचवायचे असतील आणि पुन्हा निवडून यायचं असेल तर निधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं आहे असं मत या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीमध्येबंडखोरी करून युती सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. अर्थखात्याची सूत्रे हाती येताच अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या सत्तेतील सर्व आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे.  अजित पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. ...

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट..

Image
  खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही खुलासे केले आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांची मुलाखत असलेला भाग प्रकाशित झाला. आज फडणवीस यांनी या भागावर काही ट्विट केले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी शिफारस केली, या मागची स्टोरी सांगितली आहे.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याची चर्चा महाराष्ट्रात होत होती. तेव्हा खरोखच देवेंद्र फडणवीस शॉक झाले होते. परंतू, शिंदेंनी मुख्यमंत्री केले म्हणून नाही, तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केल्याबद्दल देवेंद्रना आश्चर्य वाटले होते. यामागचा गेम प्लॅन वेगळाच होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही. सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दि...

शिंदेंना एक वर्ष मुख्यमंत्रीपदाचा वायदा होता, आता...; दानवेंचं मोठं विधान

Image
    मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ही चर्चा आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच अजित पवार केवळ उपमुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत गेले नसल्याचा दावा दानवे यांनी केला. अंबादास दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी चर्चा आणि दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंना एक वर्ष मुख्यमंत्रीपदी राहायचा वायदा होता. एक वर्ष आता संपलं आहे. त्यामुळे आता घरी जावं. हे आम्ही अधिकाऱ्यांकडून, भाजप गोटातून आणि पत्रकारांकडून ऐकत आहोत. याला पुरक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जात आहे. अजित पवार फक्त उपमुख्यमंत्री होण्यासाठी गेले नाहीत. याआधीही ते उपमुख्यमंत्री अनेकदा झाले आहेत, असंही दानवे म्हणाले. दुसरीकडे अजित पवार यांची चौकशी सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांना अटक होणार होती. वळसे-पाटील यांचं काय हेही सर्वांना माहित आहे. हे सगळे केवळ चौकशांमुळे गेले आहेत. अन्यथा हे कधीच कारागृहात गेले असते, असा दावा दानवे यांनी केला आहे....