महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसाठी तातडीचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश..

 


जिल्ह्यांत 2019 आणि 2021 मध्ये ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 52 फूट झाली होती. त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या-ज्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं, त्या सर्व कुटुंबांनी आज 25 जुलै 2023 रोजी सायंकाळपर्यंत सर्व साहित्यांसह स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या  सूचना मिळताच या सर्वांचे निवारागृहात किंवा शिबिरामध्ये स्थलांतर केलं जाणार आहे. त्यामुळं स्थलांतरित होण्यासाठी आजच सर्व तयारी करून ठेवावी, असंही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलंय.

जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 94 टक्के पर्यंत भरले आहे. त्यामुळं पंधरा दिवसांपूर्वी धरणे भरतील की नाहीत अशी परिस्थिती असताना आठवड्यामध्ये ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

  • राधानगरी धरण 8.36 टीएमसी पैकी 7.82 टीएसमी (93.55 टक्के) भरले.

  • काळम्मावाडी (दूधगंगा) धरण 25.39 टीएमसी पैकी 13.10टीएमसी (51.58 टक्के) भरले.

  • वारणा (शिराळा) धरण 34.39 टीएमसी पैकी 26.66 टीएमसी (77.50 टक्के) भरले.

  • राधानगरी पाण्याचा विसर्ग : 1400 क्यूसेक

  • पाण्याखाली असणारे बंधारे : 82

Comments

Popular posts from this blog

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

अजित पवारांचे बंड मोडून.. ? BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी काय असणार ?