"विदर्भातील पाण्याचा गुण वेगळाच"; CM शिंदेंनी विरोधीपक्ष नेते वडेट्टीवारांचं केलं स्वागत
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते म्हणून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. विदर्भातील पाण्याचा गुण वेगळाचं अशा शब्दांत त्यांनी वडेट्टीवार यांचं कौतुक केलं.
विदर्भाच्या पाण्याचा गुण वेगळाच
मुख्यमंत्री म्हणाले, आमचे उपमुख्यमंत्री विदर्भाचे, विदर्भातील पाण्याचा गुण वेगळाच आहे. विदर्भातील सुनेला देशातील राष्ट्रपतीपद मिळालं. पाहुणचार करण्यात विदर्भ हात कोणी धरू शकत नाही. पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू विदर्भात कडक असतात. तिथलं जेवण पण कडक असतं. तसे ते मूळ शिवसैनिक आहेत. त्यांचा स्वभाव बिनधास्त आहे.
तुमचे चेहरे घाबरले होते
पण या अधिवेशनात विजय भाऊंवर अन्याय झाला. नाना भाऊंनी त्यांना अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्ष नेतेपदी बसवायला हवं होतं. पण विजयभाऊ सर्व कसर भरून काढतील. ते मागे बसायचे मी म्हणायचो कधी येणार? म्हणजे पुढे कधी येणार? आता मी त्यांच्याशी हात मिळवला तरी तुमचे चेहरे घाबरले होते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.
सभागृहाला चांगला नेता लाभला
विदर्भात शिवसेना वाढवण्याचं काम विजय भाऊंनी केलं. बाळासाहेबांचा विचार मनात रुजला, ते त्याच विचारानं भूमिका घेतात. काही लोकांवर बाळासाहेब विचार लाभला तरी संस्कार दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. वडेट्टीवारांनी काँग्रेसमध्ये जाऊनही बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत. आपण सरकारमध्ये असताना काम करत होतो. लोकांना मदत करायचो. त्यामुळं सभागृहाला चांगला विरोधीपक्ष नेता लाभला आहे.
निवडणूक जवळ आली की विजय भाऊंना विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी मिळते. निवडणूक संपली की तुम्ही त्यांना विसरून जाता. २०१९ साली त्यांना सत्तेत आल्यावर कामाप्रमाणं खातं मिळालं नाही. निवडणुकीला १३ ते १४ महिने आहेत. लढायच्या वेळी विजय भाऊंना संधी मिळाली आहे.
Comments
Post a Comment