'औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताच', जेष्ठ साहित्यिक नेमाडेंचे खळबळजनक विधान


 जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबाबद्दल खळबळजनक विधान केलंय. औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताचं, असे वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं. यावेळी भालचंद्र नेमाडे म्हणाले की सर्वात आधी सती प्रथा बंद करणारा लॉर्ड बेंटिक नव्हता, तर औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली.

एका कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे म्हणाले की, "औरंगजेबाविषयी चुकीचं सांगितलं जातंय. औरंगजेब तसा नव्हताचं.सतीची चाल बंद करणारा कोण होता? इतिहासात फक्त बेंटिकचं नाव सापडतं,पण सर्वात आधी औरंगजेबानं सतीप्रथा बंद केली. "

यापुढे त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या तोडफोडीबद्दलही महत्वाचे वक्तव्य केले. काशी-विश्वेश्वर येथील पंडीतांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या, असा आरोपही त्यांनी केला. नेमाडे म्हणाले की,"औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. आल्याच नाही परत. छावणीतील लोक म्हणाले, गेल्या होत्या आल्या नाय परत. त्यानंतर ते चौकशी करायला गेले. तेव्हा तेथील जे पंडेल होते, ते तरुण बायकांना भूयारी मार्गतून नेऊन भ्रष्ठ करायचे.

हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा ती ज्ञानवापीची मोडतोड झाली. तेव्हा त्याला असं वाटल की, असे जर हे पंडे असतील तर यांना साफ केलं पाहिजे. तेव्हा इतिहासकारांनी अशी नोंद घेतली,की हा हिंदूद्वेष्टा होता.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..