"राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान


 संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या वेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. राहुल गांधींच्या भाषणाला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मणिपूरच्या हिंसाचारावर मौन बाळगले. यातून असे दिसून येते की, मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली," असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. यावर स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील हिंसेच्या घटना व अत्याचाराच्या घटनांविषयी मांडणी केली. तसेच, राहुल गांधींना संसदेतूनच थेट आव्हान दिले.

राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर... 

"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यातही अशा विधानांवर काँग्रेस पक्ष इथे बाकं वाजवत होता, टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेच्या हत्येच्या गोष्टींवर टाळ्या वाजवून यांनी साऱ्या देशाला सूचित केले की नक्की कोणाच्या मनात विश्वासघाताची भावना आहे. मणिपूरचे तुकडे अजिबात झालेले नाहीत, तो विभागलेला नाही. तो अजूनही देशाचाच भाग आहे. पण तुमच्या मित्र पक्षाचे नेते तामिळनाडूत म्हणाले की, भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्या द्रमुकच्या सहकाऱ्याचे खंडन करून दाखवा. काश्‍मीर भारतापासून वेगळे करण्‍याची चर्चा करण्याची भाषा करणाऱ्या काश्मीरमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध करून दाखवा," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले.

काँग्रेसच्या कार्यकाळातील घटनांचा वाचला पाढा...

 स्मृती इराणी यांनी काश्मीरमध्ये पंडितांवर झालेल्या अत्याचाराचाही उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी काही अत्याचार पिडित महिलांचा व त्यांच्याबाबतच्या घटनांचाही यावेळी उल्लेख केला. "तुम्ही आम्ही काश्मिरी पंडितांबद्दल बोलू इच्छित नाही. त्यांनी अश्रू ढाळले, दौरे केले. पण 1984 च्या दंगलीत पत्रकार प्रणय गुप्ता यांनी लिहिलं होतं की, मुलांना मारून त्यांचे मृतदेह आईच्या पुढ्यात टाकण्यात आले होते. नुकतेच राजस्थानच्या भिलवाडा येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ते कापण्यात आले. मग भट्टीत ठेवण्यात आले. दोन महिला खासदार तिथे गेल्या होत्या. तेथे मुलीचा एक हात भट्टीच्या बाहेर पडला होता. बंगालमध्ये एका ६० वर्षीय महिलेवर तिच्या नातवासमोर बलात्कार झाला, तेव्हा या काँग्रेसच्या लोकांनी न्यायासाठी याचना केली नाही. यावर एक शब्दही बोलण्यात आला नाही," अशा शब्दांत भाजपविरोधी राज्यांतील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी भाष्य केले.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..