'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह' फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात..अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 


सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंग सोहळ्याला सुरूवात झाली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत, केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्राचे सहकार दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना अजित पवारांनी मोदी आणि शाहांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. बोलताना अजित पवार म्हणाले की, 'शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

अमित शाह हे गुजरातचे आहेत, पण त्याचं महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असतं. हे अमित शाहांच्या रूपाने पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होतं. दोन्ही राज्यात ही सहकारातून क्रांती झालेली आहे', असंही अजित पवार म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणीही हे डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित शाहनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे', असंही ते म्हणालेत.

तर आज कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत'.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..