बाबरी पडण्याआधी पंतप्रधान राव यांना सतर्क केलं होतं, की...; शरद पवारांचा खुलासा

 


रामजन्मभूमी आंदोलन वाढत चाललं होतं. तेव्हा भाजपा नेते विजयाराजे शिंदेंनी तत्कालीन पंतप्रधान पीवी नरसिम्हा राव यांना बाबरी मस्जिदला काही होणार नाही असं आश्वासन दिले होते. त्यावेळी सहकारी मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याविरोधात पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असा खुलासा खासदार शरद पवार यांनी केला आहे. 

ज्येष्ठ पत्रकार नीरज चौधरी यांचं पुस्तक हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड च्या प्रकाशनावेळी संरक्षण मंत्री असलेले शरद पवार म्हणाले की, मी तत्कालीन गृहमंत्री आणि गृह सचिवांसोबत त्या बैठकीत उपस्थित होतो. बाबरी मस्जिदला काही होणार नाही असं विजयाराजे शिंदे यांनी तेव्हाचे पंतप्रधान नरसिम्हा राव यांना आश्वासन दिले होते. गृहमंत्री आणि गृहसचिवांना वाटत होतं काहीतरी होऊ शकते. परंतु पंतप्रधानांनी विजयाराजे यांच्यावर विश्वास ठेवला. यावेळी नीरजा चौधरी यांच्यासह अन्य पत्रकारांनी पंतप्रधान राव यांच्याशी संवाद साधत तुम्ही विवादित ढाचा पाडताना कुठे होता असा प्रश्न विचारला होता. राव यांनी पत्रकारांना सांगितले की, मी यासाठी होऊ दिले जेणेकरून ही गंभीर मुद्दा संपून जाईल आणि भाजपा त्यांचा मुख्य निवडणूक अजेंडा गमावेल असा दावा नीरजा चौधरी यांनी केला. भाजपावर विश्वास ठेवायला नको असं मी म्हटलं होतं.

या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेता शशी थरुर, माजी रेल्वे मंत्री आणि भाजपा नेते दिनेश त्रिवेदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी दिनेश त्रिवेदी यांनी पंतप्रधान राजीव गांधी असताना त्यांच्यासोबत त्यावेळी असलेल्या प्रमुख सल्लागारांपैकी एक अरूण नेहरू यांच्या भूमिकेची आठवण केली. अरूण नेहरू कुटुंबातील एक होते असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, अण्णा हजारे आंदोलनाला व्यवस्थित हाताळलं नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वातील सरकार गेले, त्याचसह सरकारमधील घोटाळे, २ जी, अण्णा आंदोलन याचा परिणाम म्हणून सरकार पडले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सर्वांना पुढे घेऊन जाणारे होते. यावेळी चव्हाणांनी अणू कराराचाही उल्लेख केला.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..