'लव्ह जिहाद'..तर जमातच नष्ट करुन दाखवू'' शिंदे गटाच्या आमदाराचं विधान, आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ

 


शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांची एक व्हिडीओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली आहे. त्यामध्ये 'लव्ह जिहाद'वरुन आमदार भोईर हे स्फोटक विधान करतांना दिसत असल्याचं सांगितलं जातंय. 'एका समाजाला संपवून टाकने' असं म्हणणाऱ्या भोईरांवर पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आगरी कोळी समाजाच्या एका कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर शेअर केली आहे. त्यामध्ये आमदार विश्वनाथ भोईर आक्षेपार्ह बोलत असल्याचं आव्हाड म्हणतात.

सदरील क्लिपमध्ये बोलतांना असं म्हटलय की, लव्ह जिहाद आगरी कोळी समाजाच्या दारात आला आहे. अगोदरच एक दोन मुली धर्म बदलून त्यांच्याबरोबर गेल्या आहेत. असं असेल तर आपण जागरुक राहिलं पाहिजे. मी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार होतो, मला पक्षातून काढलं असतं तरी चाललं असतं.. असं होत असेल तर जमातच नष्ट करुन दाखवू.. भिवंडी आणि कल्याणची दंगल आम्ही सांभाळायचो..आपणच त्यांना दुकानाला जागा देतो आणि ते आपल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात''

जितेंद्र आव्हाडांनी ही व्हिडीओ क्लिप शेअर करुन हेट स्पीच संदर्भात पोलिस कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका समाजाला संपवूनच टाकेन, असं म्हणणं विद्वेषाची परिसीमा असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट

आमदार विश्वनाथ भोईर यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याचा निषेधच केला पाहिजे. “एका समाजाला संपवून टाकेन”,अशी भाषा वापरणं हे मूलत: कुठल्या कायद्याच्या कक्षेत बसतं? मा. सर्वोच्च न्यायालयाची "हेट स्पीच" संदर्भात जी काही मार्गदर्शन तत्व आहेत; त्यामध्ये ही भाषा येते की नाही हे पोलिसांनी ठरवावं. पण, “एका समाजाला संपवूनच टाकेन” असं म्हणणं म्हणजे विद्वेषाच्या भाषणाची परिसीमा आहे. आता आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर कधी कारवाई करणार? हे पोलिसांनी जाहीर करावं.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..