लग्न एकाशी आणि हुंडा दुसऱ्याकडून...; प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर आव्हाडांचं प्रत्युत्तर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील या सोहळ्याला उपस्थित होते. शरद पवार मोदींच्या सोहळ्यात उपस्थित राहिल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. 

लग्न एकाशी करायचं आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा असं आम्ही करत नाही, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांच्या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर ?

जेव्हा तुम्ही गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता, तेव्हा तुम्हाला कळते की #GormintAunty अगदी बरोबर होती. जर तुम्हाला द्वेष,जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याच्या बाजूने जायचे असेल तर ते करा. तुमच्या ब्रेकअप स्टंटने महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना फसवू नका, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.

तसेच आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं आहे की, शरद पवरा हे नेहमीच दुटप्पी भूमिकेत असतात. एकाशी लग्न करून दुसऱ्यासोबत संसार थाटतात. त्यामुळे यावरुन जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकराना प्रत्युत्तर दिलंय. लग्न एकाशी करायचं आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा असं आम्ही करत नाही, असा टोला अव्हाडांनी लगावला आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..