भिडेंना कोठडीत कधी टाकणार? अन्यथा आम्हाला...; वडेट्टीवारांचा सरकारला इशारा
वारंवार आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांना तुरुंगात कधी टाकणार? टाकणार नसेल तर आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे
वडेट्टीवार म्हणाले, "जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाहीत. अशा गलिच्छ शब्दांत या नालायक माणसानं वक्तव्य केलं आहे. म्हणून त्याला असेल तिथून उचलून कोठडीत घालावं, ही सरकारकडून अपेक्षा आहे.
बहुजनांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान आणि त्याच्याही पलिकडे जाऊन जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले त्या साईबाबांचा अपमान, करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या करोडो लोकांचा अपमान या पापभिरु नालायक माणसानं केलेला आहे.
यावरुनच या माणसाची लायकी आणि जागा कोठडीत आहे. या माणसावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे" असंही त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही कुठेही कमी पडणार नाही
या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वतः उपमुख्यंत्र्यांनी राष्ट्रपित्या अपमान सहन करु शकत नाही अशी भूमिका मांडली होती. त्यामुळं आता भिडेंना कधी तुरुंगात टाकणार हा प्रश्न आहे. अन्यथा आम्हाला याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
Comments
Post a Comment