'...तर मी खासदारकी सोडायला तयार', ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं वक्तव्य..

  दिल्ली विधेयकावरून राज्यसभेत काल घमासान झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संजय राऊत यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला होता. त्यांनतर अमित शाह यांनी राऊतांवर पलटवार केला.  यावेळी संजय राऊत यांचा माइक बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना अमित शाह खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले, 'अमित शाह यांनी माझे भाषण नीट समजून घेतले नाही. त्यांनी माझ्या तोंडात खोटी वाक्य घातली. त्यांच्यावर हक्कभंग आणायला हवा.'

'मी म्हणालो आपले पंतप्रधान जे परदेशात जातात. त्यांचा जो काही सन्मान केला जातो. ते सर्वांना मिठ्या मारतात. गळाभेट घेतात. ही गळाभेट मोदींची नसून आपल्या देशातील लोकशाहीची महान परंपरा आहे. त्या महान परंपरा असलेल्या लोकशाहीवादी देशातील नेत्यांचा सन्मान आहे, असे माझे वाक्य होते,' असे संजय राऊत म्हणाले.  

'अमित शाह यांनी चुकीची वाक्य माझ्या तोंडी घातली. माझ्या तोंडी असं एखादं वाक्य असेल तर मी खासदारकी सोडायला तयार आहे. मी जे म्हणलं त्यापेक्षा वेगळं आपल्या सोयीने वाक्य घातले गेले. ते माझ्या समोर खोट बोलले. मला पॉईंट ऑफ ऑर्डर घ्यायची होती पण घेऊ दिला नाही. माझा माईक वारंवार बंद केला. मला बोलू दिल नाही ही लोकशाहीची गळचेपी' असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अमित शाह?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 'संजय राऊत म्हणतात, मोदी परदेशात जातात, त्यांचा सन्मान केला जातो. कोणी त्यांचे ऑटोग्राफ मागतो, कुणी वाकून नमस्कार करतो. कुणी भेटण्याची वेळ मागतो, कुणी बॉस म्हणतं. पण हा सन्मान नरेंद्र मोदींचा एकट्याचा नव्हे तर देशाचा सन्मान आहे.'

'आमच्या मनात असा कुठलाही समज नाही की, हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत सन्मान आहे. हा नरेंद्र मोदी नावाच्या पंतप्रधान असलेल्या देशाचा सन्मान आहे. पण इतर देशाचे सर्व राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना सन्मान देतात हे पाहून तुम्हीही थोडा सन्मान द्यायला सुरु करा, चांगले दिसेल', असा टोला अमित शाह यांनी संजय राऊतांना लगावला होता.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..