"लबाड लांडगा ढोंग करतोय"; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

 


भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "लबाड लांडगा ढोंग करतोय" असं म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "त्या काळात "ते" डॉक्टरांकडून नाही तर कंम्पाऊडरकडून औषधे घेत होते, कोव्हिडबाबत वैज्ञानिक नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते" असं म्हणत निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाहीच... तरीही लक्षात असू द्या... 

◆ त्या काळात "ते" डॉक्टरांकडून नाही तर कंम्पाऊडरकडून औषधे घेत होते 

◆कोव्हिडबाबत वैज्ञानिक नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते 

◆मुंबईत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाणी तुंबत नव्हते आणि हो.. सगळ्यात महत्त्वाचे जे काल व्हाईट पेपरवर उघड झाले, जे आम्ही सांगत होतोच.. 

◆वेदांता आणि फॉक्सकॉन सोबत कोणताही करार झालाच नव्हता... हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता, तरीही "ते” ‘ प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’असे गळे काढत होते. म्हणून यांचे एका वाक्यात वर्णन एवढेच! 

●●लबाड लांडगा ढोंग करतोय!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आशिष शेलार यांनी याआधी उद्धव ठाकरेंवर मुलाखतीवरून निशाणा साधला होता. "घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा चला तर मग... सोडा अहंकार... व्हा दिलदार... टोमणे मारणे सोडा.. चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा आता होऊन जाऊ दे चर्चा!!" असं म्हणत थेट आव्हान दिलं होतं. "मुंबईला कुणी किती वर्षे लुटली? मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?" असा सवाल देखील विचारला होता.

◆मुंबईला काय घातक आहे?

 ◆मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात? ◆ मुंबईला कुणी किती वर्षे लुटली? ◆ मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं? 

◆क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?

 ◆सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का ? मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार! घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा चला तर मग... सोडा अहंकार... व्हा दिलदार... टोमणे मारणे सोडा.. चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..