'स्वाभिमानी हायजॅक करणे इतकं सोपं नाही'..राजू शेट्टींचा रविकांत तुपकरांना इशारा
राजू शेट्टी यांच्या कार्यप्रणालीच्या विराेधात रविकांत तुपकर यांनी आवाज उठविला आहे. त्यावर यापुर्वीही आणि आजही राजू शेट्टींनी रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता येत्या 8 ऑगस्टला शिस्त पालन समितीची बैठकीत बोलावे असे म्हटले. त्यांच्या शंकेच निरसन करावे. दरम्यान स्वाभिमानी हायजॅक करणे इतकं सोपं नाही असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.
शेट्टींनी यांनी अन्य प्रश्नांवर बाेलताना दुधाच्या दराचा प्रश्न सोलापूर, सांगली, नगर जिल्हात गंभीर आहे. मंत्री लक्ष देत नाहीत. दुधाचे बोके जे आहेत त्यांची इडी चौकशी करावी म्हणजे काळा पैसा बाहेर येईल असेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर हायकोर्टाच्या कार्यपद्धती बद्दल लोकांच्या मनात संशय आहे. एनडीए आणि इंडिया मध्ये न जाता स्वतंत्र तिसरी आघाडी घेऊन लढणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले.
संभाजी भिडेंना अभय दिलं जातेय
महापुरुषांची आपण पूजा करतो. येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर , महात्मा गांधी साऱ्या जगाची दैवते आहेत. यांच्या बद्दल अपशब्द करणे चूक आहे. सगळे मोदी चोर म्हंटल्यावर राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडेंवर का कारवाई नाही असा सवाल
राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
Comments
Post a Comment