संसदेतून जाताना राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस; २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली तक्रार.!

 


लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींनी असभ्य हावभाव केल्याचा आरोप स्मृती यांनी केला.

सदनातून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी फ्लाईंग किसचे हावभाव केले. या घटनेबाबत भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या, "सर्व महिला सदस्यांना फ्लाईंग किस देऊन राहुल गांधी निघून गेले. एका सदस्याचे हे संपूर्ण गैरवर्तन आहे. हे सदस्याचे अयोग्य आणि असभ्य वर्तन आहे."

"भारताच्या संसदेच्या इतिहासात असे कधीच घडले नाही...हे काय वर्तन आहे? ते कोणत्या प्रकारचे नेते आहेत? त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार आम्ही सभापतींकडे केली आहे," असे खासदार करंदलाजे म्हणाल्या.

२२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांतडे तक्रारीचे पक्ष दिले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या, "माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्याला माझ्यासमोर बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्याने जाण्यापूर्वी असभ्यता दाखवली. महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाईंग किस देऊ शकतो. तो फक्त एक दुष्ट पुरुष आहे. संसदेचे. देशाच्या संसदेत असे अशोभनीय आचरण यापूर्वी कधीच पाहिले नव्हते."

"मी ऐकले होते की, "जे लोक कायद्याचे उल्लंघन करतात ते महिलांना अशा असभ्य कमेंट्स किंवा असभ्य संकेत देतात. गांधी घराण्याच्या संस्कारात देखील हा संस्कार आहे हे मला माहीत नव्हते", असे म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला.

नेमकं काय घडलं?

राहुल गांधींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गेल्या अधिवेशना राहुल गांधी यांनी मिठी मारली होती, आणि डोळे मिटकावले होते. या अधिवेशनात राहुल यांच्या फ्लाईंक किस दिल्याचा आरोप केला आहे.

जेव्हा राहुल गांधी यांचे भाषण संपले. तेव्हा त्यांचा हातातील कागदपत्र खाली पडले. हे कागद खाली पडल्यानंतर समोरच्या बाकावरुन सदस्य हसत होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी इशारा दिला आणि प्रेमाने इशारा केल्या. याचा अर्थ राहुल गांधी यांनी फ्लाईंक किस दिल्याचा आरोप सत्ताधारी महिला खासदार करत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..