''होय मी दिल्या पत्रकाराला शिव्या!'' 'व्हायरल क्लिप'वर शिंदे गटाच्या आमदाराचं स्पष्टीकरण
जळगावमध्ये अल्पवयीन पीडितेवरील अत्याचाराचं प्रकरण गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्याची बातमी देतांना एका स्थानिक पत्रकारने मुख्यमंत्र्यांबाबतीत एक शब्द वापरला. त्या शब्दावरुन आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली.
जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर भडगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे पीडित कुटुंबियांशी संवाद साधला.
या घटनेचं वार्तांकन करतांना एका स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत 'चमकोगिरी' शब्द वापरला. याचा राग आल्याने आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या प्रकरणी आता किशोर पाटील यांनी माध्यांना प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले किशोर पाटील?
जी क्लिप व्हायरल होत आहे, ती निश्चितपणे माझीच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री चमकोगिरी करतात, अशी तुमची पत्रकारिता आहे का? जर असं म्हणत असाल तर माझ्या नेत्यासाठी, माझ्या मुख्यमंत्र्यांसाठी मी शिवीगाळ केली. ज्याला घटनेचं गांभीर्य नाही, अशा पत्रकाराला मी शिव्या दिलेल्या आहेत.
Comments
Post a Comment