'देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांच्या काळात...' शरद पवार यांचे प्रतिपादन; मोदींबद्दल काय म्हणाले?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार- आणि मोदी एकाच मंचावर आले. कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
काय म्हणाले शरद पवार.?
"देशात अनेक राजे राजवाडे होऊन गेले, त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखलं जायचं. शिवछत्रपतींचं काम वेगळ्या दिशेने झालं. शिवछत्रपतींनी रयतेच स्वराज्य उभं करण्याचं काम पुणे शहरात केलं. तो पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे.. असे म्हणत देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांच्या काळात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली" असं शरद पवार म्हणाले.
तसेच यावेळी पुढे बोलताना "लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र पत्रकारिता सुरू केली. पत्रकारांवर कोणाचा दबाव असता कामा नये.. ती मुक्त असावी अशी त्यांची भावना होती.. अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नरेंद्र मोदींचे अभिनंदन...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दलही शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. लोकमान्य टिळक पुरस्कारांचे वेगळे महत्त्व होते. आत्तापर्यंत हा पुरस्कार इंदिरा गांधी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंग अशा यांना मिळाला आहे. या यादीत आता नरेंद्र मोदींचा समावेश झाला. त्याबद्दल त्यांचे मी अंतकरणापासून अभिनंदन करतो.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment