विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे जोरदार लॉबिंग, सतेज पाटलांच नाव आघाडीवर?

 


महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेसने विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदानंतर आता विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर देखील दावा सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या 9 विधान परिषद आमदारांपैकी सहा आमदारींनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता देखी सूत्रांनी वर्तवली आहे. काँग्रेसकडे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडी मधील समिकरणे देखील बदलली आहे. नुकतेच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विधान सभेचे विरोधी पक्षनेते झाले. आता यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर देखील दावा सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते आहेत. काँग्रेसच्या या नव्या मागणीनंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटल्यानंतर दोन्ही सभागृहातील संख्याबळाचे गणित बदलले..

आता महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळेच काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा ठोकला आहे. काँग्रेसकडून सतेज पाटील, अभिजीत वंजारी आणि राजेश राठोड या तीन विधान परिषदेच्या आमदारांची नावे विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे विधान परिषदेतील संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे 9 आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे 8 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 4 आमदार आहेत.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..