काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेताच 'या' पक्षाचा PM पदासाठी दावा..

 


बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांची पुढील नीती निश्चित झाली. या बैठकीला २६ राजकीय पक्ष उपस्थित होते. याच बैठकीत काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. काँग्रेसने माघार घेताच तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे.तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी राय म्हणाल्या की, जर काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असेल तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील.

पत्रकारांशी बोलताना शताब्दी म्हणाल्या, 'आमच्या नेत्या ममता यांनी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमची पुढची योजना काहीशी वेगळी असू शकते. पण स्वप्न पाहण्यात किंवा इच्छा असण्यात काहीच गैर नाही.

18 जुलै रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी स्वारस्य नसल्याचे सांगितले होते.

ते पुढे म्हणाले, 'आम्हाला माहित आहे की आमच्यात परस्पर मतभेद आहेत. पण ते इतके मोठे नाहीत की आपण त्यांना बाजूला ठेवू शकत नाही. सर्वसामान्यांसाठी, महागाईशी झगडणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी, बेरोजगारीशी झगडणाऱ्या आपल्या तरुणांसाठी, गरिबांसाठी मतभेद मागे ठेवू शकतो, असंही शताब्दी यांनी म्हटलं.

Comments

Popular posts from this blog

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

अजित पवारांचे बंड मोडून.. ? BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी काय असणार ?