'भाजपने दिलेल्या वागणूकीमुळे आम्ही शहाणे झालो, आता…'; NDA बैठकीला न बोलवल्याने मित्रपक्ष नाराज..
आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. यादरम्यान आज (१८ जुलै) रोजी नवी दिल्लीत NDA ची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठीकीत एनडीएचे ३८ पक्ष सहभागी होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या काही मित्र पक्षांना वगळण्यात आलं आहे.एनडीएच्या महत्वाच्या बैठकीसाठी निमंत्रण दिलं गेलं नसल्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांपैकी एक राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. आपण आगामी येणारी निवडणूक आम्ही स्वतंत्र लढु. भाजपने आम्हाला जी वागणूक दिली त्यामुळे आम्ही शिकलो की स्वतः च्या पायावर उभं राहायचं. आम्ही कोणाकडे भीक मागयायला जाणार नाही. आता प्रत्येक जागा आम्ही लढवणार, असे महादेव जानकर म्हणाले.
भाजपला वाटले असेल आमची त्यांना गरज नाही, त्यामुळे आम्ही कशाला भिक मागायला जाऊ की आम्हांला बोलवा. असं काही करायची गरज नाही. महाराष्ट्रात जनसुराज्य यात्रा सुरु केली आहे. आमचा पक्ष कसा वाढेल यावर आम्ही प्रयत्न करु. त्यांना असं वाटत असेल की हा पक्ष मोठा होईल. ही भीती असेल म्हणून नसेल बोलवलं. आमचे आमदार-खासदार होतील तेव्हा ते आम्हांला बोलवायला येतील. आम्ही शहाणे झालो. स्वतः च्या पायावर उभे राहिला शिकलो. आता ५३४ जागा लढवणार. आम्ही आमच्या ताकदीने लढणार, असेही महादेव जानकर म्हणाले आहेत.
या पक्षांना मिळालं निमंत्रण
एनडीएच्या आजच्या बैठकीत लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जास्तीत-जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा NDA ची तिसऱ्यांदा सत्ता कशी आणता येईल यावर चर्चा होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्र्वादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटालाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
तसेच मित्रपक्षांपैकी आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा आरपीआय (आठवले गट) यांनाही बैठकीच निमंत्रण देण्यात आले आहे मात्र भाजपचे राज्यात सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, दिवंगत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष यांना मात्र बैठकीच निमंत्रण नाहीये.
Comments
Post a Comment