“२०२४मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा NDAला बहुमत मिळेल”; CM शिंदेंनी व्यक्त केला विश्वास


 बंगळूरु येथे आज एकीकडे विरोधकांची बैठक सुरु आहे तर दुसरीकडे एनडीएची बैठक सायंकाळी आहे. त्या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीत दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील बैठकीसाठी पोहोचले आहेत.माध्यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, एनडीएमध्ये ३८ घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पु्न्हा एकदा देशात एनडीएला बहुमत मिळेल. अजित पवार पक्षात आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील विरोधकांबद्दल बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे विचारधारा असलेलं संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक नेता ठरवू शकत नाहीयेत. २०२४मध्ये संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचं नाव आदराने घेतलं जातं. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढं एनडीए बळकट होईल, असं शिंदे म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • 38 पक्ष एनडीएमध्ये सहभागी आहेत

  • मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही काम करत आहोत

  • शिवसेना हा कित्येक वर्षांचा भाजपचा सहकारी आहे

  • महाराष्ट्रात अजितदादा आणि त्यांचे सहकारी सोबत आल्याने ताकद वाढली आहे

  • सरकार आणखी मजबूत झालेलं आहे

  • एकीकडे विचारधारा असलेलं संघटन आहे

  • दुसरीकडे एवढे आहेत परंतु नेता ठरवू शकलेले नाहीत

  • २०२४मध्ये संपूर्ण देशात एनडीएला बहुमत मिळेल

  • मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबुत केलेली आहे

  • संपूर्ण जगामध्ये देशाचं नाव आदराने घेतलं जातं

  • विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढंच एनडीए मजबूत होणार

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..