NCP मोठी बातमी : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शरद पवारांकडे राजीनामा देणार

                           

                             राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शरद पवारांकडे राजीनामा देणार

अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून मोठी फूट पडली आहे. आपल्याकडे जास्त आमदारांचे पाठबळ असल्याचं अजित पवार सांगत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीवेळी दिसून आले होते. मात्र, आता त्यांनी आपली भू्मिका बदलली असून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर आताचे सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचंही ते म्हणाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी एका विचार धारेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. यामुळे मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवार साहेबांसोबतच राहावं, असं अमोल कोल्हे म्हणाले. अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थिती असल्याबद्दल बोलताना कोल्हे म्हणाले, मी माझ्या कामानिमित्त अजित पवार यांना भेटायला गेलो होतो. शपथविधी आहे, म्हणून आपण तिकडे गेलो नव्हतो. मला शपथविधीची कल्पनाही नव्हती. तिथे गेल्यानंतर याबद्दल समजले आणि तिथूनच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. दरम्यान, मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. गेल्या चार वर्षांपासून मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधितत्व करीत असून केंद्रात या मतदारसंघातील प्रश्नांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्राच्या अनेक धोरणांवर मी विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र आता अशी राजकीय परिस्थिती असताना मी कसा बदलू शकतो. असा प्रश्न मला सतावतो आहे. असेही कोल्हे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..