वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत तीन नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदे आज करणार मोठी घोषणा?
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार दाखल झाले आणि एक तास आगोदरच मिटिंग संपवून ते आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले.
दरम्यान, या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा झाल्याची माहीती समोर आली आहे. दरम्यान या तीन तांसाच्या बैठकीत खाते वाटपासंदर्भातही चर्चा झाल्याची माहीती आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीयाठी अजित पवार एक तास उशिरा पोहोचले आणि एक तास आगोदर मिटिंग संपवून आपल्या देवगिरी निवासस्थानी परतले. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक तास 23 मिनिटे बैठकीला हजर होते. अजित पवार गेल्यानंतर तासाभरानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर या निवासस्थानी परतले.तर अजित पवार यांच्या महायुतीत आल्याने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार करावा, अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्री खलबतं झाली आहेत. यावेळी तिन्ही बड्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Comments
Post a Comment