Chandrayaan-3 मोहीम फत्ते! आडीच्या सुपुत्रानं देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा; शास्त्रज्ञ लोहार यांना दुसऱ्यांदा संधी


 श्रीहरीकोटा येथे भारताचे ‘चांद्रयान-३’हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी (ता. १४) दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत निपाणी तालुक्यातील आडी येथील केरबा लोहार या अभियंत्याचा समावेश होता.आडीसारख्या  ग्रामीण भागात केरबा यांचे शिक्षण झाले. पाच वर्षांपूर्वी ते इस्रोत दाखल झाले. यापूर्वी चांद्रयान-२ या मोहिमेत  त्यांनी सहभाग दर्शविला होता. पण हे उड्डाण यशस्वी होऊ शकले नाही. त्यानंतर पुन्हा सलग तीन वर्षे सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम घेऊन चांद्रयान-३ मोहीम साकारली.

इस्रोच्या शास्त्रज्ञांसह  भारतीयांनी विजयी जल्लोष केला. लोहार म्हणाले की, भारताची चांद्रयान- ३  ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. चांद्रयान-३ अंतराळयान २३ अथवा २४ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.चांद्रयान-३ ने ४० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल. चांद्रयान-३ तीन लाख ८४ हजार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणे हे चांद्रयान-३ मोहिमेचे पहिले लक्ष्य आहे.

रॉकेटचा वेग ताशी ७ हजार किलोमीटर

चांद्रयान-३ चे वातावरणापासून संरक्षण करणारी हीट शील्ड सुमारे ९२ किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळी होईल. ११५ किमी अंतरावर चांद्रयानाचे इंजिन वेगळे होऊन क्रायोजेनिक इंजिन कार्य करण्यास सुरुवात करेल. क्रायोजेनिक इंजिन चांद्रयानाला १७९ किमी अंतरापर्यंत घेऊन जाईल. तेव्हा त्याचा वेग ३६९६८ किमी प्रति तास असेल.प्रक्षेपणाच्या १०८ सेकंदांनंतर रॉकेटचे द्रव इंजिन ४५ किमी उंचीवर सुरू होईल. त्यावेळी रॉकेटचा वेग ताशी ६४३७ किमी असेल. आकाशात ६२ किमी उंचीवर गेल्यावर दोन्ही बूस्टर रॉकेटपासून वेगळे होऊन रॉकेटचा वेग ताशी ७ हजार किमी होईल, असेही लोहार यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..