Breaking : काल अजितदादांच्या शपथविधीला हजर असलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत..

 मोठी बातमी समोर येत आहे. काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. मात्र काल अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपत घेताना जे आमदार हजर होते, त्यातीला काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले आहेत.




काल अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर आज शरद पवाराचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी कराडला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांचं आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात भव्य स्वागत केलं. शशिकांत शिंदे यांच्यासोबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि मकरंद पाटील हे देखील शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले.

दरम्यान दुसरीकडे काल अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते मंत्री शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. पवारांनी वेळ दिल्यास भेट घेणार असल्याचं या मंत्र्यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..