'मी शरद पवारांकडे भाजपाच्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो, पण…', आव्हाडांनी सांगितली ती घटना

 


भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधकांकडून किरीट सोमय्या यांच्यासह भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. राज्याच्या अधिवेशनातही हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं आहे. सोमय्या यांच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. अशा प्रकारचे व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवाण्याच्या, ह्या प्रकाराचा मी निषेध करतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, 'राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं व्यक्तिगत जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. व्यक्तिगतरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे व्यक्तिगत जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.'

तर पुढे आव्हाड म्हणातात की, 'त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.

'पुढे ते म्हणतात, 'मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..