मोदी सरकारच्या 'अग्निवीर' योजनेतून अपेक्षाभंग ? तरुण अर्ध्यातूनच सोडताहेत प्रशिक्षण ?


केंद्र सरकारने भारतीय तरुणांचे सैन्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अग्निवीर योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार, सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे तरुण वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहे.पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झालेले अनेक तरुण प्रशिक्षण अर्धवट सोडून जात अस
ल्याची माहिती समोर आली आहे.वेगवेगळी कारणे सांगून हे तरुण प्रशिक्षण अर्धवट सोडून तरुण जात आहेत. अशा प्रशिक्षण अर्धवट सोडून जाणाऱ्या तरुणांवर लष्कराकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी लष्कराने या तरुणांवर खर्च केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार असल्याचे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रशिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांसाठी कोणताही नियम नाही.पण तोपर्यंत प्रशिक्षणावर झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा, असा विचार लष्कर करत आहे.

प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडताना वेगवेगळी कारणे देत आहेत. त्यातील काहीजणांनी ३० दिवस किंवा त्याहून अधिक दिवस वैद्यकीय रजा घेतल्यामुळे प्रशिक्षणातून बाहेर फेकले गेले आहेत.तर असेही काही तरुण आहेत ज्यांना दुसरीकडे उत्तम संधी मिळाल्याने त्यांनी अग्निवीरचे प्रशिक्षण सोडून दिले आहे. तर,पहिल्या बॅचमध्येच 50 हून अधिक तरुणांना इतरत्र नोकरीची संधी मिळाल्याने त्यांनी प्रशिक्षण अर्धवट सोडल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक अग्निवीरला दरमहा सुमारे 30 हजार रुपये पगार मिळू लागतो.

अग्निवीरचे प्रशिक्षण सहा महिन्यांचे असते, त्यानंतर अग्निवीर सैन्याचा भाग बनतो. पण अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये असा कोणताही नियम नाही की, अग्निवीरचे प्रशिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी काय करता येईल.असा अद्याप कोणताही नियम भरतीच्या नियमांमध्ये नाही. जर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मध्येच सोडून गेले तर तोपर्यंत त्यांच्यावर झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल केला जातो

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..